असा तयार करा शरीराला थंडावा देणारा 'रोज बदाम शेक'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 06:00 PM2019-05-20T18:00:31+5:302019-05-20T18:00:38+5:30
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टर्सही तज्ज्ञांसोबतच लहान मुलांनाही दूध पिण्याचा सल्ला देतात. परंतु मुलं दूध पिण्यासाठी नाक-तोंड मुरडतात. खरं तर दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे ते हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अशातच मुलांना दूध पिण्यासाठी भाग पाडणं अत्यंत अवघड असतं. अशावेळी तुम्ही दूधासोबत इतर हेल्दी पदार्थ एकत्र करून पिण्यासाठी देऊ शकता. आज आम्हीही अशीच एक हटके रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया रोज बदाम शेक तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 100 ग्रॅम बदाम
- काळी मिरी
- बडिशोप
- 600 ग्रॅम साखर
- केशर
- गुलाबाच्य सुकलेल्या पाकळ्या
- कलिंगडाच्या सुकलेल्या बिया
तयार करण्याची पद्धत :
- साखर आणि पाकळ्यांव्यतिरिक्त बाकी सर्व पदार्थ मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या.
- गुलाबाच्या पाकळ्या 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये ठेवून पाणी वेगळं करून घ्या.
- पाण्यामध्ये साखर आणि मिक्सरमध्ये तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये एकत्र करून उकळून घ्या.
- मिश्रण अर्धं होईपर्यंत उकळून घ्या.
- थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
- त्यानंतर ग्लासमध्ये घेऊन त्यामध्ये थंड दूध एकत्र करून सर्व्ह करा.
गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे :
गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने तुम्ही फॅट कमी करु शकता. गुलाबात लॅक्सेटिव आणि ड्यूरेटिक गुण असतात. जे मेटोबॉलिज्मला वाढवतात, पोट साफ ठेवतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे तुमचं वजन कमी होतं. त्यासोबतच गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या स्कीनसाठीही फायद्याच्या आहेत. याने तुमचा चेहरा अधिक चमकदार होतो कारण गुलाबाच्या पाकळ्यांनी रक्त शुद्ध होतं. याशिवाय पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी, माउथ अल्सरपासून सुटका करण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठीही गुलाबाची पाकळी मदत करते.
कलिंगडाच्या बियांचे फायदे :
कलिंगड हे उन्हाळ्यात वरदान मानलं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याने दूर होतात. याने ना केवळ आरोग्याला फायदा तर सौंदर्यासाठीही कलिंगड फायदेशीर ठरतं. पण अनेकजण कलिंगडातील बीया फेकून देतात. पण कलिंगडाच्या बीया सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगडाच्या बियांनी तुम्हाला लैंगिक समस्या, मधुमेह, हृदयरोग, त्वचा आणि केसांसंबधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.