उन्हाळ्यात घरीच तयार करा ताकाच्या 'या' हटके रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:57 PM2019-04-16T15:57:12+5:302019-04-16T15:57:48+5:30
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या उकाड्यामध्ये शरीराची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कारम सन स्ट्रोकमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या उकाड्यामध्ये शरीराची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कारम सन स्ट्रोकमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेकदा डॉक्टर्सही शरीराला थंडाव्या देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत असतात. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पेय पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अनेक लोक ताक पिणं पसंत करतात. ताक चवीला अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच पोटातील उष्णता कमी करण्यासाठीही हे मदत करतं. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतींनी ताक करण्याच्या काही रेसिपी सांगणार आहोत.
(Image Credit : broomandknife.blogspot.com)
मसाला ताक
आपल्यापैकी अनेकांना मसाला ताक फार आवडतं. मसाला ताक तयार करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी अर्धा कप दह्यामध्ये अर्धा छोटा चमचा जीरेपूड एकत्र करा. त्यानंतर एक चिुटभर काळं मीठ आणि एक कप पाणी एकत्र करून व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यावर बर्फाचे तुकडे आणि पुदिना एकत्र करा. तुम्हाला मसालेदार आणि चटपटीत पदार्थ आवडतं असतील तर तुमच्यासाठी मसाला छास उत्तम पर्याय आहे.
पुदिना ताक
उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पुदिना शरीराला थंडावा देतं. तसेच पोटाच्या समस्या दूर करण्यासाठीही पुदिना फायदेशीर ठरतो. पुदिना ताक तयार करण्यासाठी एक कप दही घेऊन त्यामध्ये पाणी एकत्र करा. त्यानंतर पुदिन्याची पानं, आलं आणि अर्धा चमचा जीऱ्याची पावडर एकत्र करा. त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून थंड करा.
जीरा ताक
जीरं पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच जीरं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर ताकामध्ये जीऱ्याची फोडणी दिली तर चवीसोबतच आरोग्यासाठीही हे ताक फायदेशीर ठरतं. ताकामध्ये जीरं पावडर काळं मीठ वापरू शकता. तुम्ही ताक तयार करून त्यावर जीऱ्याची पावडर एकत्र करू शकता.
चिली ताक
उन्हाळ्यामध्ये अनेकदा मिरचीचं सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण यामुळे पोटातील उष्णता वाढते. जर तुम्हाला मिरची खाणं आवडतं असेल तर तुम्ही ताक मिरचीचा वापर करून करू शकता. सर्वात आधी दही आणि पाण्याला हिरवी मिरची आणि कढिपत्त्यासोबत एकत्र करा.