उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी 'या' फळांपासून बनवा कूल पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 01:50 PM2019-04-10T13:50:18+5:302019-04-10T13:51:35+5:30
उन्हाळ्यामध्ये नेहमी हेवी आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकदा आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशातच शरीराला थंडावा देण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
(Image Credit : JaMonkey)
उन्हाळ्यामध्ये नेहमी हेवी आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकदा आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशातच शरीराला थंडावा देण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्ही खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यासही मदत होते आणि पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासही फायदेशीर ठरतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात आंबे, कलिंगड यांसारखी सीझनल फळं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यांच्यापासून तुम्ही काही हेल्दी स्मूदी आणि सलाड तयार करू शकता. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. ही फळं पचण्यास हलकी, पौष्टिक आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही. जाणून घेऊया कलिंगड आणि आंब्यापासून तयार करण्यात येणाऱ्या उन्हाळ्यासाठी असलेल्या खास रेसिपी...
(Image Credit : imagenesmy.com)
मँगो साल्सा
मँगो साल्साचं सेवन तुम्ही उन्हाळ्यामध्ये करू शकता. हे तयार करणं अत्यंत सोपं असून याच्या नियमित सेवनाने तुमचं सन स्ट्रोकपासून रक्षण होऊ शकतं.
मँगो साल्सा तयार करण्याची कृती
एक आंबा, एक कांदा, 2 हिरव्या मिरच्या, एक छोटी काकडी, कोथिंबीरीची पानं, लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी पावडर घ्या. हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये व्यवस्थित एकत्र करा. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही यामध्ये एवोकाडोचे तुकडे एकत्र करू शकता.
(Image Credit : The Daring Gourmet)
कलिंगडाचं सलाड
कलिंगड फक्त शरीराला थंडावा देत नाही तर यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. हे उन्हाळ्यासाठी सुपर फूड ठरतं. कलिंगड सलाडच्या स्वरूपात खाऊ शकता. हे तयार करण्यासाठी कलिंगड तुकड्यांमध्ये कापून यामध्ये पनीरस पाइन नट्स आणि तुळशीची पानं एकत्र करा. कलिंगड सलाड तयार आहे.
(Image Credit : Kidspot)
फळांचे कबाब
फळांपासून तयार करण्यात आलेले कबाब उन्हाळ्यात खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट आहेत. यासाठी वेगवेगळ्या फळांचे तुकडे करून त्यावर चॉकलेट सॉस लावा. तुमचं फ्रुट कबाब तयार आहेत.
(Image Credit : Taste of Home)
मँगो स्मूदी
आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. उन्हाळ्यामध्ये याचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आंब्यामध्ये व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. यामध्य व्हिटॅमिन ए आणि सी आढळून येतं. आंब्यामध्ये अनेक आरोग्यदायी, पोषक तत्व असतात. आंब्यापासून स्मूदी तयार करण्यासाठी एक केळी, अर्धा कप दही, एक कप संत्र्याचा रस आणि बर्फाचे तुकडे एकत्र करून ब्लेंडरमध्ये मिक्स करा. त्यानंतर आंब्याचे तुकडे एकत्र करून पुन्हा ब्लेंड करा. मँगो स्मूदी तयार आहे.