शेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 04:51 PM2018-08-19T16:51:03+5:302018-08-19T23:58:09+5:30
सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरात गोडधोड पदार्थांची कायम रेलचेल असते. गोड पदार्थ म्हटलं की साऱ्यांच्याच तोंडाला पाणी येतं.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरात गोडधोड पदार्थांची कायम रेलचेल असते. गोड पदार्थ म्हटलं की साऱ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. गुलाबजाम, खीर, रसगुल्ला, जलेबी यांसारखे पदार्थ बऱ्याचदा बाहेरून आणले जातात. पण हेच पदार्थ घरच्या घरी झटपट आणि सहज तयार करता येतात. बऱ्याचदा गोड पदार्थांमध्ये खिरीला प्राधान्य देण्यात येते. तुम्हाला जर घरच्या घरी स्वादिष्ट खीर तयार करायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
साहित्य -
- बारीक शेवया
- दूध
- साजूक तूप
- वेलची पूड
- सुका मेवा
- साखर
कृती -
एका पातेल्यात दूध गरम करत ठेवावे.
दूध आटेपर्यंत ढवलतं रहावे.
दुसऱ्या पातेल्यात शेवया थोड्या मोडून मंद आचेवर तूपात भाजून घ्याव्यात.
भाजलेल्या शेवयांमध्ये दूध घालावे.
या मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर त्यामध्ये साखर घालावी.
त्यानंतर साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर खीर ढवळत रहावे.
साखर विरघळली की खीर गॅसवरून उतरवून घ्यावी.
खीर थंड झाल्यावर वेलची पूड व सुका मेवा टाकावा.
चविष्ट खीर खाण्यासाठी तयार आहे.