घरच्या घरी झटपट तयार करा बटाट्याचे काही चटपटीत पदार्थ, लहान मुलांनाही येईल मज्जा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:25 PM2024-08-05T16:25:06+5:302024-08-05T16:26:29+5:30
Potato Recipe : तुम्हालाही एखादा वेगळा आणि हेल्दी पदार्थ खावा वाटत असेल तर बटाट्याच्या मदतीने बनवू शकता. बटाट्याच्या तीन रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Potato Recipe : पावसाळ्यात पावसाच्या रिमझिम सरींसोबत अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची आवड असते. तुम्हालाही एखादा वेगळा आणि हेल्दी पदार्थ खावा वाटत असेल तर बटाट्याच्या मदतीने बनवू शकता. बटाट्याच्या तीन रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आलू टिक्की
आलू टिक्की बनवण्यासाठी उकडलेले बटाटे तुम्हाला चांगले मॅश करायचे आहेत. नंतर त्यात बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबिर, आले, लाल मिरची पावडर, बेसन, मीठ, धणे पावडर, हळद, थोडा गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करा. आता याच्या छोट्या छोट्या टिक्की तयार करा. नंतर त्या गरमागरम तेलात तळा. या टिक्की तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.
क्रिस्पी आलू चिप्स
तसेच तुम्ही सायंकाळी स्नॅक्ससाठी बटाटे धुवून घ्या. नंतर त्यांची साल काढा व पातळ स्लाइस करा. हे स्लाइस काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते कागदावर सुकायला ठेवा. सुकल्यावर ते तेलात तळून घ्या. नंतर त्यावर काळे मिरे पावडर आणि मीठ टाका. तुमचे क्रिस्पी आलू चिप्स तयार आहेत.
बटाटे भजी
तुम्ही घरच्या घरी कमी वेळात बटाट्याची भजीही बनवू शकता. यासाठी बटाटे किसून घ्या. त्यात बेसन, कापलेली हिरवी मिरची, आले, धणे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करा. हे मिश्रण जास्त पातळ करू नका. आता गरम तेलात छोटे छोटे बॉल बनवून टाका. जेव्हा त्यांना हलका सोनेरी रंग येईल तेव्हा दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.