नेहमीच थकवा जाणवत असेल तर सकाळी नाश्त्यात खा मखाना-दही, जाणून घ्या खास रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:12 PM2024-09-02T12:12:43+5:302024-09-02T12:13:19+5:30

Makhana-Curd Healthy Recipe: जर सकाळी नाश्त्यात याचं सेवन केलं तर दिवसभर एनर्जी मिळते. अशात आज आम्ही तुम्हाला मखाने आणि दह्याची एक खास रेसिपी सांगणार आहोत.

Makhana-dahi salad recipe for healthy breakfast know how to make it | नेहमीच थकवा जाणवत असेल तर सकाळी नाश्त्यात खा मखाना-दही, जाणून घ्या खास रेसिपी!

नेहमीच थकवा जाणवत असेल तर सकाळी नाश्त्यात खा मखाना-दही, जाणून घ्या खास रेसिपी!

Makhana-Curd Healthy Recipe: मखाना ड्राय फ्रूट्समध्ये वजनाने सगळ्यात हलका असतो. मात्र, याचे आरोग्याला होणारे फायदे अनेक ड्राय फ्रूट्सना मागे सोडतात. मखाना आरोग्यासाठी वरदान मानले जातात. यात कॅल्शिअमसोबतच, प्रोटीन, आयर्न, कार्बोहायड्रेट, मिनरल्स आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक तत्व भरपूर असतात. मखाना लहानांसोबतच मोठ्यांसाठीही फायदेशीर आहेत. जर सकाळी नाश्त्यात याचं सेवन केलं तर दिवसभर एनर्जी मिळते. अशात आज आम्ही तुम्हाला मखाने आणि दह्याची एक खास रेसिपी सांगणार आहोत.

लागणारं साहित्य

१  कप रोस्टेड मखाने

अर्धा कप दही

अर्धा कप डाळिंबाचे दाणे

कापलेली कोथिंबीर

चिमुटभर जिरे पावडर

चिमुटभर काळी मिरे

चिमुटभर लाल मिरची पावडर

टेस्टनुसार काळं मीठ

कशी तयार कराल ही डिश?

पहिली स्टेप

मखाना आणि दह्याची हेल्दी डिश तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मखाने एका कढईमध्ये चांगलं भाजून घ्या. त्यात अर्धा चमचा तूप टाका आणि चांगले भाजा. मखाने जळणार नाही याची काळजी घ्या. तूप टाकाल तर मखाने जास्त हेल्दी आणि टेस्टी होतील.

दुसरी स्टेप

आता एका वाटीमध्ये अर्धा कप दही घ्या आणि ते चांगलं फेटा. त्यानंतर यात अर्धा कप डाळिंबाचे दाणे टाका. नंतर चिमुटभर जिरे पावडर, काळी मिरे, लाल मिरची पावडर आणि मीठ टाका. या गोष्टी चांगल्याप्रकारे मिक्स करा. मीठ जरा उशीरा टाकाल तर टेस्ट अधिक चांगली होईल. 

तिसरी स्टेप

जेव्हा दह्याचं बेटर चांगल्या पद्धतीने तयार होईल, तेव्हा यात रोस्टेड मखाने टाकून मिक्स करा. नाश्त्यासाठी हेल्दी मखाना-दही सलाद तयार आहे. 

Web Title: Makhana-dahi salad recipe for healthy breakfast know how to make it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.