'या' ड्रायफ्रूटचे फायदे वाचाल तर काजू-बदामही विसराल, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:31 AM2024-10-29T11:31:49+5:302024-10-29T11:32:55+5:30
Soaked Nuts Health Benefits: जर रोज मखाना भिजवून खाल्ला तर याच्या फायद्यांचा प्रभाव अधिक बघायला मिळतो. अशात आज आम्ही तुम्हाला मखाना दुधात भिजवून खाल्ल्याने काय फायदे मिळतात हे सांगणार आहोत.
Soaked Nuts Health Benefits: सामान्यपणे ड्रायफ्रूट्सचा विषय निघतो तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांसमोर काजू, बदाम आणि अक्रोड येतात. मात्र, एक असंही ड्रायफ्रूट आहे जे काजू आणि बदामापेक्षाही जास्त फायदेशीर मानलं जातं. ते म्हणजे मखाना. याला "फॉक्स नट्स" किंवा "लोटस सीड्स" असंही म्हटलं जातं. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. जर रोज मखाना भिजवून खाल्ला तर याच्या फायद्यांचा प्रभाव अधिक बघायला मिळतो. अशात आज आम्ही तुम्हाला मखाना दुधात भिजवून खाल्ल्याने काय फायदे मिळतात हे सांगणार आहोत.
दूध-मखाना खाण्याचे फायदे
१) भरपूर पोषक तत्व
मखानामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि आयर्नसारखे पोषक तत्व असतात. जे आपल्या शरीराला पोषण देण्याचं काम करतात. त्याशिवाय मखान्यामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असतं. ज्यामुळे हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतात.
२) डायबिटीसमध्ये फायदेशीर
मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे मखाने डायबिटीसच्या रूग्णांसाठी सुरक्षित असतात. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहण्यास मदत मिळते आणि याच्या नियमित सेवनाने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवली जाऊ शकते.
३) हृदयासाठी फायदेशीर
मखान्यामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. तसेच यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी असतं. ज्यामुळे हृदयासाठी हे एक चांगला पर्याय आहेत.
४) हाडे मजबूत होतात
मखान्यामध्ये हाय कॅल्शिअम असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या कमी करण्यास मदत मिळते.
५) अॅंटी-एजिंग गुण
मखान्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणं दिसू देत नाहीत. तसेच शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसानही कमी होतं. त्वचा आणखी तरूण आणि तजेलदार दिसते.
कसं करावं सेवन?
मखान्याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पण जर तुम्ही भिजवून खाल्ले तर याचे फायदे आणखी वाढता. मखाने रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी याचं सेवन करा. मखाना तुम्ही दुधात भिजवून खाल्ला तर यानेही खूप फायदे मिळतात.
मखाना एक नॅचरल सुपरफूड आहे. जे शरीराला पोषण तर देतंच, सोबतच अनेक आजारांचा धोकाही कमी करतं. याच्या नियमित सेवनाने तुम्ही आरोग्य चांगलं ठेवू शकता आणि आजारांचा धोका कमी करू शकता.