‘ मोमोज’ सेहत के लिए तू तो हानिकारक है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:28 PM2017-08-04T19:28:20+5:302017-08-04T19:35:06+5:30

वाफळते,उकडलेले, मऊ मऊ असणारे, आतमध्ये रसरशीत सारण भरलेले मोमोज नुसते पाहूनही तोंडाला पाणी सुटतं. पण मोमोजचं आकर्षण हे एवढ्यापुरतीच ठीक आहे. कारण मोमोज जीभेला जेवढी भुरळ घालतात तितकेच आजारही पाठीमागे लावू शकतात. याबाबतीत झालेले अनेक अभ्यास मोमोजपासून जरा जपून हाच संदेश देत आहेत.

Momos no doubt its delicious but definately its dangerous for health. How? | ‘ मोमोज’ सेहत के लिए तू तो हानिकारक है !

‘ मोमोज’ सेहत के लिए तू तो हानिकारक है !

googlenewsNext
ठळक मुद्दे* मोमोज तयार करताना वापरल्या जाणार्या घटकांमुळे मोमोज आरोग्याच्यादृष्टीनं हानिकारक ठरत आहे.* मोमोजमध्ये आरोग्यास घातक असे मैदा, अ‍ॅझोडिकार्बोनामाइड, क्लोरोनिगॅस, बेन्झॉयल पेरॉक्साइडस आणि हानिकारक पूडींचा वापर केला जातो.* टेपवॉर्मसारखे अतिशय घातक जंतू मोमोजमुळे शरीरात प्रवेश करतात.


- माधुरी पेठकर


हल्ली स्ट्रीट फूडमध्ये एक चटकदार आयटम अ‍ॅड झाला आहे. तो म्हणजे मोमोज. बाहेर पडल्यावर जेवढ्या असोशीनं पाणीपुरी, भेळपुरी खावीशी वाटते तितक्याच तीवतेनं मोमोजही खाण्याची इच्छा होते. मोठमोठ्या मॉलच्या समोर मोमोज विकणार्या छोट्या छोट्या गाड्या उभ्या असतात. पण त्याच्यासमोरची गर्दी मात्र मोठी असते. खास मॉलसमोरचे मोमोज खायचे म्हणून मॉलमध्ये चक्कर टाकून येणारेही खूपजण असतात. वाफळते,उकडलेले, मऊ मऊ असणारे, आतमध्ये रसरशीत सारण भरलेले मोमोज नुसते पाहूनही तोंडाला पाणी सुटतं. पण मोमोजचं आकर्षण हे एवढ्यापुरतीच ठीक आहे. कारण मोमोज जीभेला जेवढी भुरळ घालतात तितकेच आजारही पाठीमागे लावू शकतात. याबाबतीत झालेले अनेक अभ्यास मोमोजपासून जरा जपून हाच संदेश देत आहेत.
मोमोज तयार करताना वापरल्या जाणार्या घटकांमुळे मोमोज आरोग्याच्यादृष्टीनं हानिकारक ठरत आहे. त्यामुळे रोज उठून मोमोज खायला न जाणं हेच उत्तम!
 

मोमोजचे दुर्गुण

1) मोमोज करताना मैदा वापरला जातो. मैद्याचं सेवन शरीरास हानिकारक असतं. शिवाय मोमोजमध्ये अ‍ॅझोडिकार्बोनामाइड, क्लोरोनिगॅस, बेन्झॉयल पेरॉक्साइडस आणि हानिकारक पूडींचा वापर केला जातो. या घटकांमुळे मोमोज चवीला चटकदार होतात पण आरोग्याचा विचार करता त्यांची गुणवत्ता एकदमच घसरते.

2) मोमोज हे नॉनव्हेजमध्येही उपलब्ध असतात. किंबहुना नॉनव्हेज मोमोज खाणारेही खूप आहेत. पण संशोधकांच्या अभ्यासानुसार नॉनव्हेजमध्ये वापरलं जाणारं चिकन हे नित्कृष्ट प्रतीचं आणि बर्याचदा उतरलेलं असतं. जे पोटाच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूपच घातक असतं.

3) व्हेज मोमोजचीही तर्हा  तशीच. व्हेज मोमोजमध्ये वापरल्या जाणार्या भाज्या व्यवस्थित धुतलेल्या आणि शिजवलेल्या नसतात. यामुळे इकॉइल सारखे घातक जंतू पोटात जातात. आणि पोटाच्या संसर्गाला कारणीभूत ठरतात.

4) मोमोजबरोबर देण्यात येणारी चटणी एकदम झणझणीत असते. यासाठी वापरल्या जाणार्या मिरची पूडमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. आणि एवढी झणझणीत चटणी खाण्यात आल्यानं रक्तस्त्राव किंवा मूळव्याध सारखे आजार मूळ धरतात आणि नंतर बळावतातही.

5) मोमोजमध्ये मोनो सोडियम ग्लुटामेटचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे अतिलठ्ठपणा सोबतच, उदासिनता, अति घाम येणं, मळमळ, छातीत धडधडणं असे आजारही होवू शकतात.

6) टेपवॉर्मसारखे अतिशय घातक जंतू मोमोजमुळे शरीरात प्रवेश करतात. हे जंतू मेंदूत घर करतात आणि पुढे वाढत राहतात. जीवघेणे आजार यातून उदभवू शकतात.

Web Title: Momos no doubt its delicious but definately its dangerous for health. How?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.