कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळलात?, मग 'पालक भजी' ट्राय कराच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 05:49 PM2019-06-18T17:49:21+5:302019-06-18T17:52:36+5:30
पावसाळा म्हटलं की, सर्वांकडे गरमा गरम भजी तयार करण्याचा बेत असतोच. अशावेळी कांद्याच्या भजी, बटाट्याची भजी तयार करण्यात येतात. पण त्याच त्याच भजी खाऊन कंटाळा येतो.
पावसाळा म्हटलं की, सर्वांकडे गरमा गरम भजी तयार करण्याचा बेत असतोच. अशावेळी कांद्याच्या भजी, बटाट्याची भजी तयार करण्यात येतात. पण त्याच त्याच भजी खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही दररोज त्याच भजी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला हटके पर्याय सांगणार आहोत. तुम्ही दररोजच्या भजींव्यतिरिक्त पालकच्या भजी तयार करू शकता.
पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा डॉक्टर्सही पालकच्या भाजीचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला देत असतात. पण बऱ्याचदा एकाच पद्धतीने तयार केलेली भाजी खाऊन आपण कंटाळतो आणि त्या भाजीकडे दुर्लक्ष करतो. तुम्हीही पालकची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आता पालकच्याच भाजीपासून तयार केली जाणारी एक हटके रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. ती तुम्ही ट्राय करू शकता.
अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यावेळी त्यांना याच पालेभाज्यांपासून हटके पदार्थ करून खाऊ घालू शकता. जाणून घेऊया पालकची भजी तयार करण्याची रेसिपी...
पालकची भजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- पालकाची जुडी बारीक चिरून घ्या
- बेसन
- मीठ
- तिखट
- चिमूटभर हिंग
- हळद
- थोडी कोथिंबीर
- तेल
पालकची भजी तयार करण्याची कृती :
एका पातेल्यामध्ये बेसनाचं पिठ घ्या.
बेसन पिठामध्ये चिरलेला पालक, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर घालून कालवा.
एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा.
तेल गरम झाल्यानंतर मिश्रणाच्या खमंग भजी तळून घ्या.