नवरात्रीच्या काळात बंगालमध्ये केले जाणारे हटके पदार्थ तुम्हाला माहित आहे का? खाल्ले तर तुम्हालाही ते हवेसेच वाटतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 06:39 PM2017-09-22T18:39:17+5:302017-09-22T18:45:52+5:30

आलू पोस्तो, काचा गोला, मिष्टी दोई, बैंगन भजा आणि छोलार डाल हे पश्चिम बंगालमधले काही हटके पदार्थ नवरात्रीत बनवले जातातच. आपण नुसतेच याबद्दल ऐकलेलं असतं. पण याची चव एवढी अफलातून आहे की आपल्यालाही हे पदार्थ आपल्याकडे करून बघावेसे वाटतातच.

Must take a taste of these special foods, these are specially makes in Navratri in west Bengal | नवरात्रीच्या काळात बंगालमध्ये केले जाणारे हटके पदार्थ तुम्हाला माहित आहे का? खाल्ले तर तुम्हालाही ते हवेसेच वाटतील!

नवरात्रीच्या काळात बंगालमध्ये केले जाणारे हटके पदार्थ तुम्हाला माहित आहे का? खाल्ले तर तुम्हालाही ते हवेसेच वाटतील!

ठळक मुद्दे* बंगाली बांधवांची आलू पोस्तो ही डिश दूर्गा पूजेबरोबरच अन्य सणांनाही हमखास बनवली जाणारी डिश आहे. आपल्या महाराष्ट्रात आपण सणावारी जशी बटाट्याची कोरडी भाजी बनवतो, तशीच ही आलू पोस्तो डिश बंगालमध्ये बनवली जाते.* बंगाली बांधवांचा संदेश हा गोड पदार्थ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. मऊ पनीरपासून बंगालमध्ये संदेश आणि इतर विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. काचा गोला देखील असाच एक गोड पदार्थ आहे.* मिष्टी दोई हा तर बंगाली बांधवांचा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. बंगालची ओळख करु न देणारा पारंपरिक पदार्थ आहे. सोप्या भाषेत आपण यास गोड दही म्हणू शकतो.



- सारिका पूरकर-गुजराथी

नवरात्र उत्सवास कालपासून प्रारंभ झालाय. भारतभरात या उत्सवाची धूम आहे. शक्तीचा, मांगल्याचा हा उत्सव भारताच्या प्रत्येक राज्यात विविधतेनं साजरा होतो. या उत्सवासाठी पश्चिम बंगाल अतिशय प्रसिध्द आहे. बंगाली बांधवांसाठी दूर्गा पूजा हा वर्षातील सर्वात मोठा सण असतो, दिवाळीपेक्षाही खूप मोठा उत्सव म्हणून तो साजरा होतो. नवीन कपडे, मिठाईची रेलचेल, सजावट, रोषणाई असे चित्र संपूर्ण बंगालमध्ये दिसून येतं. धुनी आरती, सिंदूर खेला या काही अनोख्या परंपराही या उत्सवात पाहायला मिळतात. तर अशा या बंगाली बांधवांच्या दूर्गा पूजा उत्सवात काही हटके पदार्थ बनतात. हे पदार्थ पारंपरिक आहे .
 

1) आलू पोस्तो

खसखस पाण्यात भिजवून ती वाटून पेस्ट करु न घेतली जाते. नंतर तेल किंवा तूपात मिरची, हळदीची फोडणी करु न उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि खसखशीची पेस्ट घालून ही भाजी बनवली जाते. आवडीप्रमाणे यात हिंग, कोथिंंबीर, तिखट, कढीपत्ता याचा वापर केला जातो. बंगाली बांधवांची आलू पोस्तो ही डिश दूर्गा पूजेबरोबरच अन्य सणांनाही हमखास बनवली जाणारी डिश आहे. आपल्या महाराष्ट्रात आपण सणावारी जशी बटाट्याची कोरडी भाजी बनवतो, तशीच ही आलू पोस्तो डिश बंगालमध्ये बनवली जाते.

 


 

2) काचा गोला
बंगाली बांधवांचा संदेश हा गोड पदार्थ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. मऊ पनीरपासून बंगालमध्ये संदेश आणि इतर विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. काचा गोला देखील असाच एक गोड पदार्थ आहे. दूर्गा पूजा उत्सवात तो नैवेद्यासाठी हमखास बनवला जातो. मऊ पनीर चांगले मळून कढईत परतून घेतल्यानंतर यात कंडेस्ड मिल्क घालून आणखी परतून गोळा एकजीव केला जातो. थंड झाल्यावर या मिश्रणाचे लाडू वळून खवा-माव्यामध्ये, बदामच्या भरडमध्ये घोळवले जातात. शाही काचा गोला दूर्गामातेसाठीच्या नैवेद्यातील एक प्रमुख पदार्थ आहे.

 


 

3) मिष्टी दोई
हा तर बंगाली बांधवांचा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. बंगालची ओळख करु न देणारा पारंपरिक पदार्थ आहे. सोप्या भाषेत आपण यास गोड दही म्हणू शकतो. बंगाली बांधव मिष्टी दोई मातीच्या लहान मडक्यांमध्ये, वाट्यांमध्ये खाण्यास देतात. एका भांड्यात दूध गरम करायला ठेवूून त्यास उकळी आली की त्यात चवीनुसार साखर घालून दूध अर्ध होईपर्यंत आटवलं जातं. नंतर पॅनमध्ये साखर घालून त्याचं कॅरेमल दूधात घालून दूध कोमट असतानाच त्यात दोन चमचे दही घालून विरजण लावलं जातं. हे विरजलेलं दही मातीच्या मडक्यात घालून रात्रभर ठेवलं की तयार होते मिष्टी दोई. काही बंगाली बांधव यात साखरेऐवजी गुळाचाही वापर करतात. दही सेट झालं की मग ते फ्रीजमध्ये गार करु न वर बदाम-पिस्त्याची भरड भुरभुरु न खाल्लं जातं.

 


 

4) बैंगन भजा
आपण सणावारी गिलके, बटाटे यांची भजी करतो ना तसेच बंगाली बांधव बैंगन भजा बनवतात. खायला क्रि स्पी आणि टेस्टी असा बैंगन हा देखील नवरात्रीत केला जाणारा पारंपरिक बंगाली पदार्थ आहे. वांगे धुवून गोलाकार पातळ काप केले जातात. नंतर हळद, आमचूर पावडर, गरम मसाला,धने-जिरे पावडर, तिखट, मीठ हे मसाले एकत्र करु न वांग्याचे काप यात मॅरिनेट केले जातात. नंतर तांदळाच्या पीठात हे काप घोळवून शॅलो फ्राय करु न बैंगन भजा तयार केला जातो.


 

5) छोलार डाल
बंगालची संस्कृती, परंपरा यांचं प्रतीक असलेला आणखी एक पदार्थ म्हणजे छोलार डाल, नवरात्रात हा पदार्थ केल्याशिवाय नवरात्र साजरे होत नाही. हरभरा डाळ भिजवून शिजवून घेतली जाते. नंतर, दालचिनी, लवंग आणि वेलचीची पावडर, मीठ, चवीला साखर, किसलेलं आलं डाळीत घालून मिक्स करु न डाळीला जिरे, हिंग, साबूत लाल मिरचीची फोडणी दिली जाते. नंतर साजूक तूपात किसलेलं ओलं किंवा सुकंखोबरं तळून ही फोडणी सर्वात शेवटी डाळीवर ओतली जाते. छोलार डाळ चवीला खमंग तर लागतेच शिवाय बंगाली पदार्थांचे वेगळेपणही या पदार्थातून दिसून येतं.

 

Web Title: Must take a taste of these special foods, these are specially makes in Navratri in west Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.