National Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:15 PM2018-11-16T13:15:42+5:302018-11-16T13:31:38+5:30

हल्ली वेळेअभावी आपण अनेकदा जेवण घरी तयार करण्याऐवजी हॉटेलमधून विकत आणतो. बऱ्याचदा तर जंक फूडचाही आधार घेतो. त्यामुळे मुलांनाही घरी तयार केलेल्या पदार्थांऐवजी फास्ट फूड खाणं आवडतं.

National Fast Food Day Recipe of Making Banana Fritters | National Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल!

National Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल!

googlenewsNext

हल्ली वेळेअभावी आपण अनेकदा जेवण घरी तयार करण्याऐवजी हॉटेलमधून विकत आणतो. बऱ्याचदा तर जंक फूडचाही आधार घेतो. त्यामुळे मुलांनाही घरी तयार केलेल्या पदार्थांऐवजी फास्ट फूड खाणं आवडतं. ताटामध्ये एखादी पालेभाजी असेल तर मुलं नाकतोंड मुरडतात. पण तेच एखादा फास्ट फूडचा पदार्थ असेल तर आवडीने खातात. अशातच आईसमोर फार मोठं आव्हान असतं की, आपल्या मुलाच्या आहारात त्याला आवडणाऱ्या पदार्थांसोबतच असे काही पदार्थांचा समावेश करावा जे त्याच्या शारीरिक वाढीसाठाही फायदेशीर ठरतील. तुम्हीदेखील याच चिंतेत असाल तर तुमच्यासाठी आज एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे बनाना फ्रिटर्स. हे पाहून तुमची मुलं खुश होतीलच त्याचप्रमाणे हे त्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. बनाना फ्रिटर्स हा एक केळ्याच्या पुरीप्रमाणे एक पारंपारिक दक्षिण भारतात तयार करण्यात येणारा पदार्थ आहे. जाणून घेऊयात हा पदार्थ तयार करण्याची खास रेसिपी...

साहित्य :

  • रवा एक टेबल स्पून 
  • 1/4 टीस्पून 
  • ¼ टीस्पून गोड सोडा (सोडियम बायकार्बोनेट)
  • एक चिमुटभर मीठ
  • एक कप तेल
  • एक टीस्पून बडिशेप
  • दोन केळी
  • ¼ कप पीठ
  • ¼ कप तांदळाचं पीठ

 

कृती :

- सर्वात आधी एका बाउलमध्ये केळी व्यवस्थित स्मॅश करून घ्या. स्मॅश केलेल्या केळ्यांमध्ये पीठ, तांदळाचं पीठ, रवा, मीठ, गोड सोडा आणि बडिशेप एकत्र करा. 

- त्यानंतर बडिशेप एका पॅनमध्ये थोडी भाजून त्याची पूड तयार करून घ्या. 

- कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यानंतर तयार मिश्रण पॅनमध्ये डोश्याप्रमाणे पसरवून घ्या. 

- लक्षात ठेवा पॅनमध्ये थोड्या थोड्या अंतरावर हे मिश्रण पसरवा. त्यानंतर तीन ते चार मिनिटांपर्यंत सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्रिटर्स तयार करा. 

- खाण्यासाठी टेस्टी फ्रिटर्स तयार आहेत. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही वेगवेगळ्या आकारातही तयार करू शकता. 

- मुलांना प्लेटमध्ये सर्व्ह करा टेस्टी फ्रिटर्स. 

Web Title: National Fast Food Day Recipe of Making Banana Fritters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.