National Fast Food Day : असं तयार करा स्ट्रॉबेरी क्रिम ट्रफल पुडिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 05:22 PM2018-11-16T17:22:55+5:302018-11-16T17:25:34+5:30
स्ट्रॉबेरी म्हटलं की, आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक असो किंवा स्ट्रॉबेरी आइसक्रिम. आपण सगळे चवीने खातो.
स्ट्रॉबेरी म्हटलं की, आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक असो किंवा स्ट्रॉबेरी आइसक्रिम. आपण सगळे चवीने खातो. अनेकदा मुलंही वेगळा आणि हटके पदार्थ खाण्यासाठी हट्ट करतात. अशात प्रत्येकवेळी बाहेर जाणं शक्य होत नाही. मुलांचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी स्ट्रॉबेरी क्रिम ट्रफल पुडिंग तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- वॅनीला आइसक्रिम
- दोन चमचे स्ट्रॉबेरी क्रश
- अर्धा कप बारीक कापलेली फळं
- अर्धा कप मोठे तुकडे फळं
- 6 कपकेक्स किंवा एगलेस केक या ब्रिटानिया केकचे तुकडे
- एक कप पाइनअॅपल ज्यूस
- 6 चेरी
कृती :
- एका बाउल घ्या आणि केक दोन तुकड्यांमध्ये कापून त्याची लेअर द्या.
- आता त्यामध्ये पाइनअॅपल ज्यूस दोन चमचे टाका.
- त्यानंतर त्यावर फळांची ले्र तयार करा.
- आता आइसक्रिममध्ये स्ट्रॉबेरी क्रश मिक्स करा.
- आइसक्रिमला फळांवर लेअरप्रमाणे सजवा.
- केकच्या दुसऱ्या तुकड्याने कव्हर करा.
- त्यानंतर त्यावर बारिक कापलेल्या फळांची दूसरी लेअर तयार करा.
- त्यावर स्ट्रॉबेरी आइसक्रिम लावून चेरीने सजवा.
- खाण्यासाठी तयार आहे स्ट्रॉबेरी क्रिम ट्रफल पुडिंग.