Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:35 PM2019-10-03T13:35:23+5:302019-10-03T13:38:15+5:30
नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात. अशातच अनेकांसमोर उपवासासाठी कोणते पदार्थ खावे हा प्रश्न असतो.
नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात. अशातच अनेकांसमोर उपवासासाठी कोणते पदार्थ खावे हा प्रश्न असतो. तसेच हा पदार्थ पौष्टिक असण्यासोबतच खाल्यानंतर पोट भरावं असंही त्यांना वाटत असतं.
अनेकदा अशावेळी साबुदाण्याचा आधार घेण्यात येतो. अनेक लोक साबुदाण्याची खिचडी किंवा वडा तयार करून खातात. पण हे पदार्थ तयार करण्यासाठी तूप आणि तेलाचा वापर करण्यात येतो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. जर तुम्हाला लो-कॅलरी आणि लो-फॅट डाएट फॉलो करायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याची भेळ तयार करून खाऊ शकता.
साबुदाण्याची भेळ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- साबुदाणे
- उकडलेले बटाटे
- शेंगदाणे
- काजू
- हिरव्या मिरच्या
- सैंधव मीठ
- डाळिंबाचे दाणे
- किसलेलं खोबरं
- तूप
- कोथिंबीरीची पानं
साबुदाण्यांची भेळ तयार करण्याची कृती :
- साबुदाणे व्यवस्थित स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा.
- उकडलेल्या बटाट्यांची साल काढून त्यांचे मध्ये आकारात तुकडे करून घ्या.
- एखादा पॅन किंवा कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या आणि थंड होण्यसाठी ठेवा. त्यानंतर काजूचे तुकडे आणि किसलेलं खोबरं भाजून घ्या.
- एका पॅनमध्ये 2 चमचे तूप एकत्र करा. तूप गरम झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये जिरं आणि मिरचीची फोडणी द्या.
- त्यानंतर फोडणीमध्ये साबुदाणे एकत्र करा आणि मध्यम आचेवर ते परतून घ्या. साबुदाणे शिजल्यानंतर नरम आणि पारदर्शी दिसतात.
- आता या मिश्रणामध्ये कापलेले बटाटे, सैंधव मीठ, हिरव्या मिरच्या, काजू, खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे एकत्र करा.
- गार्निशिंगसाठी लिंबाचा रस, हिरवी कोथिंबीर आणि डाळिंबाच्या दाण्यांचा वापर करा.
- खाण्याच्या काही वेळ अगोदर ही भेळ तयार करा आणि गरम गरम सर्व्ह करा.