Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:43 PM2019-09-29T13:43:40+5:302019-09-29T13:45:36+5:30

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे.

Navratri 2019 : Special Receipe for navratri fast Bottle Gourd or dudhi bhopala Burfi Recipe | Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी

Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी

googlenewsNext

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. यातील काही लोक अशीही आहेत जी नऊ दिवसांसाठी उपवास करतात. या उपवासादरम्यान ते फक्त फराळाचे पदार्थ खातात. 

अनेक लोक उपवासादरम्यान, साखर, फळं, दूध, ड्रायफ्रुट्स खाता. अशातच तुम्ही हेल्दी आणि स्वीट रेसिपी तयार करून नवरात्रीच्या उपवासा दरम्यान खाऊ शकता. जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासासाठी खास आणि झटपट तयार होणारी रेसिपी... 

दुधी भोपळ्याची बर्फी : 

नवरात्रीच्या उपवासासाठी दुधी भोपळ्याची बर्फी अत्यंत फायदेशीर ठरते. ही रेसिपी पौष्टिक असण्यासोबतच चवीलाही भारी लागते. पण अनेकांना ही भाजी आवडत नाही. पण एकदा याची बर्फी तयार करून पाहा. तुम्हाला नक्की आवडेल. फक्त उपवासासाठीच नाहीतर तुम्ही इतर दिवशीही हा पदार्थ तयार करू शकता. ही रेसिपी तयार करणं अत्यंत सोपं आहे. जाणून घेऊया दुधी भोपळ्याची बर्फी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती : 

दुधी भोपळ्याची बर्फी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • दुधी भोपळा 1 किलो
  • खवा 250 ग्रॅम
  • साखर 200 ग्रॅम 
  • ड्रायफ्रुट्स
  • किसलेलं खोबरं 
  • वेलची पावडर 
  • तूप 

 

अशी तयार करा दुधी भोपळ्याची बर्फी

- सर्वात आधी दुधी भोपळ्याची साल काढून तो किसून घ्या. 

- गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकून किसलेला भोपळा परतून घ्या. त्यानंतर काही वेळासाठी त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्या.

- शिजल्यानंतर त्यामध्ये साखर एकत्र करून एकजीव करून घ्या. 

-  मिश्रणात तूप एकत्र करा आणि त्यानंतर मावा, ड्रायफ्रुट्स आणि किसलेलं खोबरं एकत्र करून शिजवून घ्या. 

- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा. 

- एका प्लेटमध्ये तूप लावून मिश्रण त्यामध्ये पसरवून घ्या. तुम्ही त्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्सही पसरवू शकता. त्यानंतर पसरवलेल्या मिश्रणाच्या वड्या पाडून घ्या. 

- पौष्टिक आणि चविष्ट दुधी भोपळ्याची बर्फी तयार आहे. 

Web Title: Navratri 2019 : Special Receipe for navratri fast Bottle Gourd or dudhi bhopala Burfi Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.