पिझ्झा आणि नूडल्सपेक्षा आता लोकांना आवडतेय बिर्याणी. पाश्चात्य पदार्थांना मागे टाकून स्थानिक पदार्थांना पुन्हा एकदा खवय्यांची प्रचंड मागणी!

By admin | Published: July 8, 2017 06:38 PM2017-07-08T18:38:54+5:302017-07-08T18:38:54+5:30

मधल्या काळात फास्ट फूडचं आकर्षण वाटत होतं. परंतु सध्या भारतीय पदार्थांमधील न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्यातील सात्विकता याचं महत्व खवय्यांना पटू लागलं आहे,

Now people love pizza and noodles. Overflowing of western goods again and again huge demand for domestic grains! | पिझ्झा आणि नूडल्सपेक्षा आता लोकांना आवडतेय बिर्याणी. पाश्चात्य पदार्थांना मागे टाकून स्थानिक पदार्थांना पुन्हा एकदा खवय्यांची प्रचंड मागणी!

पिझ्झा आणि नूडल्सपेक्षा आता लोकांना आवडतेय बिर्याणी. पाश्चात्य पदार्थांना मागे टाकून स्थानिक पदार्थांना पुन्हा एकदा खवय्यांची प्रचंड मागणी!

Next

 

- सारिका पूरकर-गुजराथी

‘जुनं ते सोनं’ असं म्हणण्याची वेळ आलीय आता पुन्हा एकदा. दिवसेंदिवस भारतीय तसेच त्या त्या त्या राज्यातील पारंपरिक पदार्थांना खवय्यांकडून प्रचंड मागणी वाढतेय. एरवी हॉटेलमध्ये जायचं ते चायनीज हक्का नूडल्स, पिझ्झा, बर्गर्स, सॅण्डविचेस हे वेगळ्या म्हणण्यापेक्षा विदेशी चवींच्या पदार्थांच्याा आकर्षणापोटी. आता चित्र बदललं आहे. देशभरातील हॉटेल्समध्ये भारतीय चवीच्या पारंपरिक पदार्थांना मागणी वाढली आहे. भारतीय पाककलेत प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे. विविध मसाले, विविध पद्धती वापरुन एकापेक्षा एक भन्नाट चवीचे पदार्थ आपल्याकडे तयार होतात. डाळ, भात, पुलाव, भाज्या, चटण्या, कोशिंबीरी, गोडाचे पदार्थ या प्रत्येक प्रकारात शेकडो प्रकार बनवले जातात. हेच नाही तर भजी, पकोडे, कटलेट, पापड यांसारख्या स्टार्टर्समध्ये, सूप, सार, लोणची, रायता या तोंडी लावण्यातही प्रचंड चवींचा समृद्ध खजाना आपल्याकडे आहे. शिवाय देशभरातील खाऊगल्लीत तयार होणाऱ्या प्रांतीय पदार्थांना तर जगभरात तोड नाहीये. पंजाबचे छोले भटूरे, फेसाळलेली लस्सी, लखनौचे कबाब, पराठे, महाराष्ट्राची पिठलं-भाकरी, पुरणपोळी, राजस्थानची डाळबाटी, गुजरातचा ढोकळा, बंगालचे रसगुल्ले, दक्षिण भारतातील इडली-डोसा या पदार्थांनी तर पौष्टिकता, चवीतील वैविध्यता यामुळे भारतीयांच्या जिभेवर आणि मनात कायमची जाग पटकावलीय.

 

भविष्यात ३० मीनिटात बिर्याणी पार्सल घरपोच देण्याचे उद्दिष्ट दिल्लीतील ‘बिर्याणी ब्ल्यूज’चे रेमण्ड अ‍ॅण्ड्रयूज यांनी बोलून दाखवले आहे. ते पुढे म्हणताय की आमच्या हॉटेलमध्ये अमेरिकन, चायनीज पदार्थांपेक्षा दालमाखनी, पावभाजी, छोले भटुरे, मसाला डोसा या पदार्थांनी त्यांच्या हॉटेलमध्ये लोकप्रिय पदार्थांच्या यादीत पहिले पाच क्रमांक पटकाविले आहेत. थोडक्यात भारतीय पाककलेत भरपूर मसाले असतात, खूप तेल-तूप असते असा एक आक्षेप नेहमीच नोंदवला जातो. परंतु भारतीय खाद्यसंस्कृतीइतका चव आणि पौष्टिकता यांचा संगम जगातील कोणत्याच खाद्यसंस्कृतीत आढळत नाही म्हणूनच ही संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी हा ट्रेण्ड खूप मोठी संधी आहे.

Web Title: Now people love pizza and noodles. Overflowing of western goods again and again huge demand for domestic grains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.