नाश्त्यासाठी खास हेल्दी ओट्स इडली; पोटाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:33 PM2019-02-07T17:33:45+5:302019-02-07T17:34:51+5:30
नाश्त्यामध्ये अनेक लोक ओट्सचा समावेश करतात. जर तुम्हीही नाश्त्यासाठी ओट्स खात असाल आणि एकाच प्रकारे तयार केलेल ओट्स खाउन कंटाळला असाल तर, तुम्ही ओट्स इडली ट्राय करू शकता.
नाश्त्यामध्ये अनेक लोक ओट्सचा समावेश करतात. जर तुम्हीही नाश्त्यासाठी ओट्स खात असाल आणि एकाच प्रकारे तयार केलेल ओट्स खाउन कंटाळला असाल तर, तुम्ही ओट्स इडली ट्राय करू शकता. ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये ओट्सची इडली खाल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते. ओट्सपासून तयार केलेली ही इडली खाण्यासाठी अत्यंत चविष्ट आणि तयार करण्यासही अगदी सोपी आहे. ओट्सपासून तयार करण्यात आलेली इडली खाल्याने तुम्हाला एनर्जी मिळते. तसेच लठ्ठपणाचाही त्रास होत नाही. कारण ही इडली खाल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. नाश्त्यामध्ये काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता.
ओट्स इडली तयार करण्यासाठी साहित्य :
- ओट्स 1/4 कप
- उडदाची डाळ 1 कप
- आलं 1/8 चमचा
- हिरव्या मिरचीची पेस्ट 1 चम्मचा
- पाणी दीड कप
- तेल एक मोठा चमचा
- मीठ चवीनुसार
अशी तयार करा ओट्स इडली :
- ओट्स आणि उडदाची डाळ एकत्र करा.
- आता मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करा.
- या पावडरमध्ये पाणी एकत्र करा आणि पेस्ट तयार करा.
- पेस्टमध्ये मीठ आणि हिरव्या मिरचीची पेस्ट एकत्र करून थोडा वेळासाठी बाजूला ठेवा.
- तयार मिश्रण एका तासासाठी असचं ठेवा.
- एका तासाने इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये तयार मिश्रण भरा.
- त्यानंतर भांड्यामध्ये 10 मिनिटांसाठी पाणी गरम करून त्यानंतर त्यामध्ये मिश्रण भरलेले साचा ठेवा.
- 20 मिनिटांनी गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
- त्यानंतर भांड्यामधून इडली काढून सर्व्ह करा.
- हेल्दी आणि टेस्टी ओट्स इडली खाण्यासाठी तयार आहे.
- खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा गरम गरम हेल्दी ओट्स इडली.