अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतं भेंडीचं पाणी, जाणून घ्या कसं कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 01:00 PM2024-09-14T13:00:14+5:302024-09-14T13:04:38+5:30

Lady Finger Water Heath Benefits : अनेकांना हे माहीत नसतं की, भेंडीच्या पाण्याने सुद्धा शरीराला एकापेक्षा एक फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Okra water is prevent many diseases, know its benefits and how to consume it! | अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतं भेंडीचं पाणी, जाणून घ्या कसं कराल सेवन!

अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतं भेंडीचं पाणी, जाणून घ्या कसं कराल सेवन!

Lady Finger Water Heath Benefits : जास्तीत जास्त लोक भेंडीची भाजी आवडीने खातात. काही लोक भेंडी फ्राय करून किंवा भरलेली खातात. भेंडी खाण्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, भेंडीच्या पाण्याने सुद्धा शरीराला एकापेक्षा एक फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक्सपर्टनुसार, डायबिटीस या आजारावर ठोस असा कोणताही उपाय नाही. हा आजार केवळ केवळ हेल्दी डाएट आणि अ‍ॅक्टिव लाइफस्टाईलच्या माध्यमातून कंट्रोल केला जाऊ शकतो. अशी बरीच फळं आणि भाज्या आहेत ज्या शुगरच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत. अशीच एक भाजी म्हणजे भेंडी. भेंडीचं सेवन केल्याने डायबिटीसची लक्षणं कंट्रोलमध्ये राहतात. भेंडी डायबिटीसच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. जर तुम्हाला वाढलेली शुगर कंट्रोल करायची असेल तर भेंडीच्या भाजीचं नियमित सेवन करा.

भेंडीतील पोषक तत्व

100 ग्राम भेंडीमध्ये 35 कॅलरी, 1.3 ग्राम प्रोटीन आणि 0.2 ग्राम फॅट असतं. या भाजीमध्ये फायबरही भरपूर असतं. तसेच यात व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेटसारखे महत्वाचे व्हिटॅमिन्सही असतात. अशात जाणून घेऊ भेंडी डायबिटीस कशी कंट्रोल करते.

भेंडीमध्ये भरपूर फायबर

अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसोबत भेंडीमध्ये दोन्ही प्रकारचे फायबर भरपूर असतात. डायबिटीसच्या रूग्णांसाठी भेंडी फार फायदेशीर आहे. फायबर पचन व्हायला वेळ लगतो. हेच कारण आहे की, भेंडी ब्लडमध्ये फार हळूहळू शुगर सोडते. ज्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढत नाही.

वजन कमी करा

भेंडीच्या पाण्यात पूर्ण फायबर येत नाही. तरीही याने वजन कमी करण्यास मदत मिळते. Pubmed वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भेंडीच्या पाण्याच्या अर्कात असे कार्ब्स असतात जे शारीरिक वजन, ब्लड शुगर लेव्हल आणि टोटल कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. याने हायड्रेशन वाढतं. जे वजन कमी करण्यासाठी गरजेचं आहे.

ग्लायसेमिक इंडेक्सचं काम

यातील फायबर हे तत्व शुगर लेव्हल मॅनेज करतात. या भाजींचं ग्लायसेमिक इंडेक्सचंही काम असतं. याचा अर्थ असा होतो की, असं खाद्यपदार्थ ज्याने शुगर लेव्हल कमी होते आणि हे खाल्ल्याने निघणारी शुगर हळूहळू पचते.

प्रोटीनची पॉवर हाऊस भेंडी 

भेंडी अशा भाज्यांपैकी एक आहे ज्यात प्रोटीन भरपूर असतं. शुगरच्या रूग्णांना नेहमीच आहारात प्रोटीन सेवनाचा सल्ला दिला जातो. कारण याने व्यक्तीला तृप्त ठेवण्यास मदत मिळते आणि शुगर असलेले फूड खाण्यास रोखते. त्याशिवाय भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात. ज्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. जे डायबिटीसच्या रूग्णांसाठी गरजेचं आहे.

भेंडीचं पाणी कसं बनवाल?

- मध्यम आकाराच्या पाच ते सहा भेंडी घ्या आणि त्या स्वच्छ धुवून घ्या.

- भेंडीचे शेंडे दोन्ही बाजूने कापून घ्या.

- एका भांड्यात तीन कप पाणी टाकून त्यात कापलेली भेंडी टाका.

- ही भेंडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

- सकाळी भेंडी पिळून पाणी वेगळं करा आणि हे पाणी रिकाम्या पोटी प्या.
 

Web Title: Okra water is prevent many diseases, know its benefits and how to consume it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.