...म्हणून मुलांना बाजारातील रेडिमेड फ्रूट ज्यूसपासून दूर ठेवा - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:44 PM2019-01-31T13:44:57+5:302019-01-31T13:46:14+5:30

आपण अनेकदा फ्रेश ज्यूस पिण्याऐवजी बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड फ्रूट ज्यूसला पसंती देतो. तुम्हीही असं करत असाल? तर आता असं करणं शक्यतो टाळा. कारण या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.

Parents should not give kids fruit juice it can be harmful for brain | ...म्हणून मुलांना बाजारातील रेडिमेड फ्रूट ज्यूसपासून दूर ठेवा - रिसर्च

...म्हणून मुलांना बाजारातील रेडिमेड फ्रूट ज्यूसपासून दूर ठेवा - रिसर्च

Next

(Image Credit : stjhs.org)

आपण अनेकदा फ्रेश ज्यूस पिण्याऐवजी बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड फ्रूट ज्यूसला पसंती देतो. तुम्हीही असं करत असाल? तर आता असं करणं शक्यतो टाळा. कारण या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर यामध्ये अनेक पोषक तत्वांचीही कमतरता आढळून येते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना असे पॅकेटबंद फ्रूट ज्यूस देणं टाळलं पाहिजे. कंज्यूमर रिपोर्ट्समार्फत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, अमेरिकेमधील प्रसिद्ध अशा 45 ब्रँड्सच्या फ्रूट ज्यूस प्रोडक्टची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये असं आढळून आलं की, सर्व फ्रूट ज्यूसमध्ये कॅडमियम, इनऑर्गेनिक आर्सेनिक आणि मर्क्युरी म्हणजेच शिसं यांसारख्या घातक पदार्थांचा समावेश आहे.

संशोधनामध्ये ज्या ब्रँड्सच्या ज्यूसचा समावेश करण्यात आला होता, त्यामध्ये जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त ब्रँड्सच्या ज्यूसमध्ये मेटलचा अंश आढळून आला, तर 7 प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर मेटल आढळून आलं. त्यामुळे मुलांनी हा ज्यूस थोडा जरी प्यायला किंवा पूर्ण दिवसभरामध्ये अर्धा कप ज्यूस प्यायला तर हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. या संशोधनामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, यामुळे फक्त लहान मुलांना धोका नाही तर मोठ्या व्यक्तींनीही याचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

खरं सांगायचं झालं तर फूड आणि ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणाऱ्या हेव्ही मेटलला काढून टाकणं अशक्य आहे. विषारी घटक कोणत्याही पदार्थांपर्यंत हवा, पाणी किंवा मातीमार्फत पोहोचतात. याव्यतिरिक्त कळत-नकळत मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स किंवा प्रोडक्ट्स पॅकेजिंगदरम्यानही यांमध्ये टॉक्सिन्स येतात. काही ज्यूस असे असतात, ज्यांमध्ये फक्त मेटल असणंच चिंतेचा विषय नाही. यामध्ये इतरही मेटल्सचा अंश असतो, जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. संशोधनानुसार, ज्यूसमध्ये आढळून आलेलं हे मेटल मुलांच्या डेव्हलपिंग ब्रेन आणि नर्वस सिस्टमला नुकसान पोहचवू शकतात. 

बाजारात मिळणारे ऑर्गनिक ज्यूस किंवा खासकरून लहान मुलांसाठी असलेले ज्यूस त्यांच्यासाठी फायदेशीरच ठरतील असं नाही. द्राक्षांच्या ज्यूसमध्ये इतर ज्यूसपेक्षा मेटलचे प्रमाण अधिक असते. ज्यूस कोणताही असो किंवा कोणत्याही ब्रँडचा. सगळ्या ज्यूसमध्ये मानवी शरीराला हानिकारक असणारे घटक आढळून येतात. फक्त अर्धा कप अशा ज्यूसचं सेवन करणंही आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. 

Web Title: Parents should not give kids fruit juice it can be harmful for brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.