नाश्त्यामध्येही लोकांना हवं आइसक्रीम;यंदा मागणी १६ टक्के वाढली, सर्वाधिक खप सायंकाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:19 AM2024-05-04T11:19:55+5:302024-05-04T11:21:51+5:30

स्विगीच्या अहवालानुसार, १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ७ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत सर्वाधिक आइस्क्रीम मागविण्यात आली. या कालावधीत स्विगीने ६.९ लाखांपेक्षा अधिक आइस्क्रीमचा पुरवठा केला.

People also want ice cream for breakfast; this year the demand has increased by 16 percent, the highest consumption is in the evening | नाश्त्यामध्येही लोकांना हवं आइसक्रीम;यंदा मागणी १६ टक्के वाढली, सर्वाधिक खप सायंकाळी

नाश्त्यामध्येही लोकांना हवं आइसक्रीम;यंदा मागणी १६ टक्के वाढली, सर्वाधिक खप सायंकाळी

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेमुळे देशात आइस्क्रीमची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आइस्क्रीमची मागणी १६ टक्के वाढली आहे, असे एका अहवालातून पुढे आले आहे. स्विगीने आइस्क्रीमबाबतचा एक अहवाल सादर केला आहे.  

स्विगीच्या अहवालानुसार, १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ७ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत सर्वाधिक आइस्क्रीम मागविण्यात आली. या कालावधीत स्विगीने ६.९ लाखांपेक्षा अधिक आइस्क्रीमचा पुरवठा केला. त्यातून आइस्क्रीमप्रेमींच्या अनोख्या कहाण्याही समोर येत आहेत. मुंबईतील एका व्यक्तीने स्विगीवरून ४५  दिवसांत ३०० पेक्षा अधिक आइस्क्रीम मागवून एक वेगळा विक्रम केला आहे.  

दिवस सुरु होताच...

अनेक लोक सकाळी नाश्त्यासोबतही आइस्क्रीम खाणे पसंत करतात. सकाळी ७ ते ११ या वेळात स्विगीने ८० हजार आइस्क्रीम पुरवल्या. 

सर्वाधिक आइस्क्रीम बंगळुरुमध्ये 
दिले गेले. हैदराबादच्या लोकांना क्रीम स्टोन आइस्क्रीम चांगलीच पसंत पडली.

कोणत्या आइस्क्रीमला आहे जास्त मागणी?

यंदा चॉकलेट फ्लेवरसोबतच इतर फ्लेवरच्या आइस्क्रीमही लोक मागवत आहेत. नारळ, बदाम आणि व्हॅनीला आइस्क्रीम सर्वाधिक मागवली जात आहे. मुंबईत फ्रूट फ्लेवर आइस्क्रीमला सर्वाधिक मागणी आहे. हैदराबादेत  ड्रायफ्रूटच्या आइस्क्रीमला जास्त मागणी आहे.

व्हेगनला मागणी 

यंदा लोक व्हेगन आइस्क्रीमलाही पसंती देत आहेत. व्हेगन आइस्क्रीमची मागणी ७० टक्के वाढली आहे. महानगरांमध्ये लोक नॅचरल्स आइस्क्रीम पार्लरला पसंती देत आहेत.

Web Title: People also want ice cream for breakfast; this year the demand has increased by 16 percent, the highest consumption is in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.