'या' किड्यामुळे अनेकांनी पत्ता कोबी खाणं सोडलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:51 PM2020-01-06T16:51:33+5:302020-01-06T16:54:09+5:30
अनेक लोक पत्ताकोबी खाण्यासाठी फारसे उत्सुक नसतात.
अनेक लोक पत्ताकोबी खाण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. कारण त्यांना ती भाजी खायला खायला आवडत नाही. पण बाहेरचे अन्नपदार्थ खाताना पत्ता कोबी हमखास खाल्ली जाते. मन्चुरियन बॉल्स किंवा मन्चुरियन भेळ खाताना तसंच बर्गर खाताना कोबीची एक वेगळीच चव लागत असल्यामुळे कोबीचे सेवन केलं जातं. पण मध्यंतरी लोकांनी कोबी खाणं सोडून दिलं होतं.
कारण त्यात असलेल्या एका प्रकारच्या किड्यामुळे कोबी खाण्यासाठी लोक खूप विचार करत असायचे. तुम्ही सुद्धा पत्ता कोबी खावा कि खाऊ नये याबाबत शंका बागळून असाल तर आज आम्ही तुम्हाला कोबीच्या सेवनाबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया पत्ता कोबीत असणारा किडा कसा असतो.
पत्ता कोबीमध्ये एका प्रकारच्या अळ्या असतात. त्यांना टेपवर्म म्हणतात. ही टेमवर्म पोटात गेल्यास रक्तप्रवाहासोबतच शरीराच्या इतर भागांवर सुद्धा परिणाम करत असते. तर काही प्रकारच्या अळ्या या डोळ्यांना दिसणार सुद्धा नाही अशा लहान आकाराच्या असतात. पण जर यापासून बचाव करायचा असल्याल कोबीची भाजी घरी तयार करण्याआधी चिरून उकळून घ्या. उकळल्यामुळे त्यातील शरीरासाठी अपायकारक ठरणारे घटक नष्ट होतील.
टेपवर्म पावसाच्या पाण्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे जमिनीत पोहोचतात. नंतर ते भाज्यांवर आल्याने त्या माध्यमातून शरीरासाठी घातक ठरतं असतात. टेपवर्ममुळे शरिराला जे ईन्फेक्शन होते त्याला टॅनिएसिस (taeniasis) असं म्हणतात. ज्यामुळे शरिराच्या आतल्या भागात जखमा होतात.
या किड्याचं इन्फेक्शन झाल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होते. त्याशिवाय थकवा येणं, विटामिन्स, आणि रक्तदाबासंबंधी समस्या उद्भवू शकतात. या किड्याची लांबी ३.५ मीटर पर्यंत असते. या किड्यांची ५ हजारपेक्षा जास्त प्रजाती आहेत. आशियाई देशांच्या तुलनेत युरोपीयन देशात या किड्यांचे प्रमाण कमी आहे.