मनुक्याच्या पाण्याचं सेवन काही लोकांसाठी ठरतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:38 PM2024-10-23T12:38:03+5:302024-10-23T12:42:11+5:30
Soaked Raisins Water Side Effects : मनुक्याच्या पाण्याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काही लोकांसाठी याचं रिकाम्या पोटी सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.
Soaked Raisins Water Side Effects : बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी वेगवेगळे ड्राय फ्रूट्स खातात. सामान्यपणे ड्राय फ्रूट्सचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. काजू, बदामासोबतच मनुके सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही लोकांसाठी मनुक्याचं पाणी पिणं नुकसानकारक ठरतं.
आयुर्वेदात मनुके भिजवून ठेवून त्याचं पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. मनुक्याच्या पाण्याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काही लोकांसाठी याचं रिकाम्या पोटी सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कोणत्या लोकांनी पिऊ नये मनुक्याचं पाणी.
1) डायबिटीस
डायबिटीसच्या रूग्णांनी मनुक्याचं पाणी पिऊ नये. कारण मनुक्याचं ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतं, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
2) एलर्जी
मनुके आणि द्राक्ष स्टोर करण्यासाठी सल्फाइटचा वापर केला जातो. मनुके हे तत्व शोषूण घेतं. त्यामुळे मनुक्याच्या सेवनाने काही लोकांना एलर्जी होऊ शकते.
3) पचनासंबंधी समस्या
ज्या लोकांना पचनासंबंधी किंवा पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या असतात, त्यांनी सुद्धा रिकाम्या पोटी मनुक्यांचं पाणी पिणं टाळलं पाहिजे.
4) किडनी समस्या
किडनी स्टोनची समस्या असल्यावर मनुक्याच्या पाण्याचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करू नये. कारण मनुक्यातील ऑक्सालेट किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका वाढवतं.