पाइनअॅपल शेक तयार करा घरच्या घरी; चवीला लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:33 PM2019-05-05T18:33:02+5:302019-05-05T18:34:05+5:30
सध्या बाजारामध्ये काही सीझनल फळांची वर्दळ दिसत आहे. यामध्ये आंबा, कलिंगड आणि अननस यांसारख्या फळांचा मुख्य समावेश आहे. आपण अनेक तज्ज्ञांकडून नेहमीच ऐकतो की, सीझनल फळांचा आहारात सामावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
(Image Credit : MyRecipes)
सध्या बाजारामध्ये काही सीझनल फळांची वर्दळ दिसत आहे. यामध्ये आंबा, कलिंगड आणि अननस यांसारख्या फळांचा मुख्य समावेश आहे. आपण अनेक तज्ज्ञांकडून नेहमीच ऐकतो की, सीझनल फळांचा आहारात सामावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण या फळांमध्ये त्यावेळच्या वातावरणानुसार शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचा मुबलक साठा असतो. अशातच आज आम्ही तुम्हाला अननसापासून तयार करण्यात येणारी एक हटके रेसिपी सांगणार आहोत.
अननस एक असं फळ आहे, जो अनेक व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असतो. यांमध्ये मिनरल्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरतं. यासर्व सकारात्मक गोष्टींव्यतिरिक्त यांमध्ये कॅलरीही कमी असतात. डायबिटीजवर अनेक संशोधनं करण्यात आली. त्या संशोधनांनुसार, फायबरयुक्त डाएट घेतल्याने फक्त ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत मिळत नाही तर. त्यामुळे कोलेस्ट्रॉलही कमी होते. एवढचं नाही तर पोटाच्या समस्याही दूर होतात. याव्यतिरिक्त वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही अननस लाभदायक ठरतं. कारण यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोट दिर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटतं. तसेच फॅट्सही कमी होतात.
उन्हाळ्यामध्ये दिवसभरात काहीना काही थंड पेय पिण्याची इच्छा असते. अशातच तुम्ही घरातच टेस्टी पाइनअॅपल शेक तयार करून पिऊ शकता. चवीष्ठ असण्यासोबच हे हेल्दी असतात. जाणून घेऊया पाइनअॅपल शेक तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
साहित्य :
- अननसाचा रस
- दूध
- साखर
- फ्रेश क्रिम
- संत्र्याचा रस
- लिंबाचा रस
- ड्राय फ्रुट्स
- आइस क्यूब
कृती :
1. सर्वात आधी अननसाचा रस, संत्र्याचं रस आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यामध्ये साखर एकत्र करा.
2. आता हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी कमीत कमी अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा.
3. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध थंड करून घ्या.
4. जेव्हा ज्यूस आणि दूध थंड होईल त्यानंतर मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आइस क्यूब एकत्र करून पुन्ह मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या.
5. तयार मिश्रणामध्ये फ्रेश क्रिम आणि साखर एकत्र करा. तुम्हाला गरज असेल तर पिठीसाखरेचाही वापर करू शकता. त्यानंतर तयार मिश्रण फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
6. पाइनअॅपल शेक तयार असून शुगर क्रिम आणि ड्रायफ्रूट्सचा वापर करून गार्निश करा.
7. थंडगार अननसाचा म्हणजेच पाइनअॅपल शेक तयार आहे.