वजन कमी करताय? मग बिनधास्त पोहे खा; असे ठरतात फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:08 PM2019-03-28T17:08:25+5:302019-03-28T17:10:52+5:30
आपल्या घरांमध्ये नाश्ता म्हटलं की, पोहे... हे समीकरणचं जुळून आलं आहे. नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात.
आपल्या घरांमध्ये नाश्ता म्हटलं की, पोहे... हे समीकरणचं जुळून आलं आहे. नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. तेवढेचं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पोहे पचण्यासाठी अत्यंत हलके असतात. तुम्ही पोहे तयार करताना यामध्ये भाज्या, शेंगदाणे एकत्र करू शकता. ज्यामुळे पोहे आणखी पौष्टिक करण्यास मदत होते. जाणून घेऊया वजन कमी करण्यासोबतच पोहे खाण्याचे शरीराला होणारे फायदे...
पोहे खाण्याचे शरीराला होणारे फायदे :
शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी
पोह्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं. याच्या सेवनाने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे मदत करतं. त्यामुळे डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे अत्यंत पौष्टिक ठरतात. अशातच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुमही पोहे खाऊ शकता.
कार्बोहाइड्रेट मुबलक प्रमाणात
पोह्यांमध्ये 75 % कार्बोहाइड्रेट आणि 25 % फॅट्स असतात. हे खाल्याने शरीरामध्ये हेल्दी फॅट्सची कमतरता भासत नाही. म्हणूनच पोहे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
कॅलरी कमी असतात
पोह्यांमध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा सतत प्रयत्न करत असाल तर तर डाएटमध्ये पोह्यांच्या समावेश करणं फायदेशीर ठरतं. एक वाटी व्हेजिटेबल पोह्यांमध्ये जवळपास 250 कॅलरी असतात. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सदेखील मुबलक प्रमाणात असतात.
पचण्यास फायदेशीर
पोह्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे हे पचण्यासही हलके असतात. मग तुम्ही कितीही खा. पोहे खाल्याने ब्लोटिंगची समस्याही होत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.