जंक फूड आवडतं; मग होणाऱ्या 'या' आजारांबाबतही जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:41 PM2019-06-14T12:41:03+5:302019-06-14T12:43:11+5:30
प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. हे माहीत असूनही अनेक लोक अनहेल्दी फूडपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. परिणामी, हार्ट डिजीजव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो.
प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. हे माहीत असूनही अनेक लोक अनहेल्दी फूडपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. परिणामी, हार्ट डिजीजव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रोसेस्ड फूडपासून शक्य असेल तेवढं दूर राहणंचं फायद्याचं ठरतं. प्रोसेस्ड फूडचं सेवन करणं आरोग्यासाठी कशाप्रकारे हानिकारक ठरतं जाणून घेऊया...
(Image Credit : Sweat)
1. प्रोसेस्ड फूडच्या अतिसेवनाने सेक्स ड्राइव्हवर वाईट परिणाम दिसून येतात. कारण प्रोसेसिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्ट्रिप्स पोषक तत्व नष्ट करतात. नष्ट झालेल्या तत्वांमध्ये अशा न्यूट्रियंट्सचाही समावेश होतो, जे सेक्सची इच्छा वाढविण्यासाठी मदत करतात. उदाहर्णार्थ, जेव्हा गव्हावर प्रोसेस करून पिठ तयार करण्यात येतं. त्यावेळी यामध्ये असलेलं झिंकची तीन चतुर्थांश प्रमाण नष्ट होतं. जे सेक्स ड्राइव्हसाठी महत्त्वाचं मिनरल असतं.
2. प्रोसेस्ड फूडच्या सेवनाने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. मागील वर्षी करण्यात आलेल्या एका संशोधनाननुसार, ज्या पदार्थांमध्ये फ्लेवर्स आणि अॅडिटिव असतात. त्यांच्या सेवनाने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
3. प्रोसेस्ड फूडमध्ये साखरचे प्रमाण अधिक असतं. साखरेव्यतिरिक्त मुबलक प्रमाणात फॅट्स आणि सोडिअमदेखील असतात. जे आरोग्यासाठी घातक ठरतं. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीज आणि हृदयाच्या आजारांचा सामना करावा लागतो.
4. प्रोसस्ड फूडमध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व कार्बोहायड्रेट्स नुकसानदायी ठरतात. परंतु, यामध्ये काही अशी तत्व असतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेवल वेगाने वाढते आणि डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.
5. प्रोसेसिंगच्या दरम्यान खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधील फायबर पूर्णपणे काढून टाकण्यात येतं. त्यामुळे हे शरीरामध्ये अब्जॉर्ब होत नाहीत आणि पचनाशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय बद्धतोष्टसारख्या समस्यांही होऊ शकतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.