कैरीच्या लोणच्यात 'हा' पदार्थ टाका, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 02:15 PM2021-05-21T14:15:12+5:302021-05-21T14:16:10+5:30
बनवायला सोप्पी, कमी सामग्रीत होणारी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण यात एक असा घटक आहे ज्यामुळे ही रेसिपी परिपूर्ण होते.
कैरीचं लोणचं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं. कैरी आहेच असं फळ जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विकपॉईंट असतं. आज आपण कैरीची अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही तुमची बोटे चाटत रहाल. बनवायला सोप्पी, कमी सामग्रीत होणारी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण यात एक असा घटक आहे ज्यामुळे ही रेसिपी परिपूर्ण होते. कोणता जाणून घ्या...
साहित्य
एक किलो कैरी
एक चमचा हिंग
दिड चमचा लाल मिर्चीची पावडर
अर्धा कप राईचं तेल
चवीनुसार मीठ
कृती
प्रथम कैरी पाण्यात धुवून घ्या व स्वच्छ पूसून घ्या. त्याच्या लहान लहान फोडी करा. त्यात मीठ घालून दोन ते तीन दिवस उन्हात पॅकबंद कंटेनरमध्ये ठेऊन द्या. मध्ये मध्ये हे मिश्रण हलवत राहा. आता यातील पाणी काढून टाका. आता या कैरीच्या फोडी स्वच्छ कपडा पसरून उन्हात वाळत घाला. तोपर्यंत तुम्ही येथे राईचे तेल गरम करून थंड करत ठेवा. कैरीच्या उन्हात सुकत घातलेल्या फोडी जास्त सुकवू नका. त्या रसदार राहु द्या. त्यानंतर कैरीच्या फोडींमध्ये हिंग, मिर्ची पावडर, राईचं तेल व्यवस्थित मिक्स करा. झालं तुमचं कैरीचं लोणचं तयार. तुम्ही हे चपाती, पराठे, पुऱ्या अगदी कशासोबतही खाऊ शकता. स्वच्छ बरणीत भरून तुम्ही एका वर्षासाठी साठवून ठेऊ शकता.