Raksha bandhan Special रेसिपी - यावेळी भावाला बांधा आणि खा चॉकलेटची राखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:19 AM2018-08-24T11:19:05+5:302018-08-24T11:20:21+5:30
आश्चर्याची बाब म्हणजे ही मिठाई केवळ मिठाई नाही तर राखी सुद्धा आहे. म्हणजे ही तुम्ही बांधूही शकता आणि खाऊ सुद्धा शकता. चला जाणून घेऊ याची रेसिपी....
(Image Credit : Insity.com)
रक्षाबंधन आणि मिठाई या दोन्ही गोष्टींशिवाय रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करणार? पण त्याच त्या बाहेरुन आणलेल्या मिठाई खाण्यापेक्षा घरीच जर एक वेगळी मिठाई तयार केली तर? चला आज आम्ही तुम्हाला अशीच एक स्पेशल मिठाईची रेसिपी सांगणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मिठाई चॉकलेटपासून तयार करावी लागणार आहे. त्यामुळे ही कुणाला आवडणार असं होणार नाही. त्याहून एक आश्चर्याची बाब म्हणजे ही मिठाई केवळ मिठाई नाही तर राखी सुद्धा आहे. म्हणजे ही तुम्ही बांधूही शकता आणि खाऊ सुद्धा शकता. चला जाणून घेऊ याची रेसिपी....
साहित्य -
५०० ग्रॅम कुकिंग चॉकलेट, डार्क चॉकलेट असेल तर उत्तम.
चॉकलेट तयार करण्यासाठी साचा
कापलेले ड्राय फ्रूट किंवा स्प्रिंकल
सेलो टेप, बांधण्यासाठी प्लास्टिक शीट किंवा क्लिंग टेप, सॅटिन रेबिन आणि कात्री.
चॉकलेटची राखी कशी बनवाल?
1) चॉकलेट एका भांड्यात किंवा मायक्रोव्हेवमध्ये वाफेच्या मदतीने वितळवून घ्या.
२) साच्यामध्ये बारीक कापलेले ड्राय फ्रूट किंवा स्प्रिंकल पसरवा.
३) आता यात वितळवलेलं चॉकलेट टाका. चॉकलेटमधील हवा काढण्यासाठी त्यावर हळूहळू वरुन प्रेस करा.
४) हे ३० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
५) आता सॅटिन रेबिन जी राखीच्या धाग्याच्या रुपात वापरायची आहे, तुमच्या भावाच्या हाताच्या मनगटाच्या हिशोबाने कापा.
६) चॉकलेट जर व्यवस्थित सेट झाली असेल तर साच्यातून काढा.
७) आता चॉकलेट क्लिंग टेपमध्ये गुंडाळा.
८) सेलो टेपच्या मदतीने आधी साच्या, चॉकलेट आणि सॅटिन रेबिनचा चिकटवा. तुमची राखी तयार आहे.
गोड आणि हेल्दी मिठाई-
डार्क चॉकलेट आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते. त्यामुळे ही वेगळी राखी वापरने चांगले होईल. ५ ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये २७.३ कॅलरी असतात आणि या मिठाईमध्ये वरुन साखरेचा वापरही केला नसतो. त्यामुळे इतर मिठाईपेक्षा ही मिठाई खाणे कधीही चांगले.