पोटाच्या वेगवेगळ्या समस्या दूर करते कच्च्या केळाची भाजी, फायदे वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 10:23 AM2020-01-06T10:23:28+5:302020-01-06T10:33:05+5:30
केळी खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हे एक असं फळ आहे ज्याने वजन वाढवण्यासोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते.
केळी खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हे एक असं फळ आहे ज्याने वजन वाढवण्यासोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, जेवढा फायदा पिकलेल्या केळींचा असतो, तेवढाच कच्च्या केळींचा देखील असतो. आज आम्ही तुम्हाला कच्च्या केळीच्या भाजीचे फायदे सांगणार आहोत. हे वाचून तुम्ही नेहमी कच्च्या केळीची भाजी खाल....
पोटाच्या समस्या होतील दूर
(Image Credit : vox.com)
तज्ज्ञांनुसार, कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, कॉपर, व्हिटॅमिन बी-६ भरपूर प्रमाणात असतात. याने शरीरात ऊर्जा वाढण्यास मदत मिळते. पोटदुखी किंवा सतत टॉयलेटचा जाण्याची समस्या ही कॉमन आहे. अलिकडे आपली लाइफस्टाईल इतकी बदलली आहे की, सतत अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. अशात फायबरयुक्त कच्ची केळी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत मिळते.
डिप्रेशनपासून मुक्ती
(Image Credit : kqed.org)
कच्च्या केळींमध्ये ट्रिप्टोफॉन तत्व आढळून येतं. हे शरीरात गेल्यावर प्रोसेस झाल्यावर सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होतं. सेरोटोनिन मेंदूसाठी हॅप्पी हार्मोन्ससारखं काम करतं. याने डिप्रेशन, तणाव, स्ट्रेस सारख्या मानसिक समस्या दूर होण्यास मदत मिळते.
पचनक्रिया चांगली होण्यास फायदेशीर
कच्च्या केळाची भाजी आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाल्ल्याने पोटासंबंधी समस्यांचा तुम्हाला कधीच सामना करावा लागणार नाही. कारण याने तुमची पचनक्रिया अधिक चांगली होते. म्हणजेच पोट चांगलं राहिलं तर अर्थातच तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामनाही करावा लागणार नाही.
डायरियापासून बचाव
कच्ची केळी खाल्ल्याने डायरियासारख्या आजारापासून लगेच आराम मिळतो. कारण याने पचन चांगलं होतं. यात फायबर आणि पाण्याची प्रमाण अधिक असतं. याने शरीराला गरजेचे पोषक तत्व मिळून शरीर मजबूत होतं.