केवळ स्वादिष्ट फूडसाठीच नाही तर 'या' कारणांसाठीही प्रसिद्ध आहे विराट कोहलीचं रेस्टॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:13 AM2018-08-29T11:13:48+5:302018-08-29T11:15:46+5:30
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्यावर्षी दिल्लीमध्ये आपलं रेस्टॉरंट सुरु केलं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्यावर्षी दिल्लीमध्ये आपलं रेस्टॉरंट सुरु केलं. नुएवा नावाच्या या रेस्टॉरंटबाबत लोकांमध्ये चर्चा आहेच सोबतच या रेस्टॉरंटची खासियत पाहून देश-विदेशातील पर्यटक इथे येऊ लागले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये साऊथ अमेरिकनसहीत अनेकप्रकारचे पदार्थ मिळतात. आर.के.पुरममध्ये सुरु झालेलं नुएवा रेस्टॉरंट केवळ पदार्थांमुळेच नाही तर आपल्या सर्व्हिसमुळेही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. आज आम्ही तुम्हाला विराटच्या या रेस्टॉरंटची खासियत सांगणार आहोत.
१) चीफ मायकल स्वामीचे पदार्थ
नुएवा रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला चीफ मायरल स्वामीच्या फेमस डिशचा स्वाद चाखायला मिळेल. मायकल स्वामी प्रसिद्ध शेफ, फूड स्टायलिस्ट, लेखक आणि ट्रॅव्हल फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. मायकल हे भारतातील टॉप ५० शेफमध्ये गणले जातात.
२) वेगळ्या फूडने बनेल तुमचा मूड
असे म्हणतात की, जेवण अशी एक गोष्ट आहे जी तुमचा मूड चेन्च करु शकते. विराट कोहलीच्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला असंच जेवण दिलं जाईल. नुएवा प्रसिद्ध आहे दक्षिण अमेरिकी जेवणासाठी. पण त्यासोबत ते आणखीही काही चांगले पदार्थ वाढतात. त्यासोबतच चहा, कॉफी आणि आणखीही काही पदार्थ तुम्ही इथे एन्जॉय करु शकता.
३) ग्राऊंड फ्लोरला आहे बार
कोणत्याही रेस्टॉरंटला त्यांच्या फूडने आणि एम्बिएन्सने जज केलं जातं. नुएवाचं एम्बिएन्स सुद्धा खास आहे. हे रेस्टॉरंट दोन भागांमध्ये विभागलं आहे. ग्राऊंड फ्लोरला बार आणि लाऊंज तयार केला आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत एन्जॉय करु शकता.
४) विराट कोहली
या रेस्टॉरंटमध्ये येण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे विराट कोहली. जर तुम्ही क्रिकेटचे शौकीन आहात आणि विराट कोहलीला पसंत करता तर या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही नक्की यायला हवं. कदाचित तुमची विराटसोबत भेटही होऊ शकते.