वांग्याचं झणझणीत 'झटका भरीत' तुम्ही खाल्लंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:46 PM2019-02-04T13:46:04+5:302019-02-04T13:46:23+5:30
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. अशातच अनेकदा तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही वांग्याच्या हटके रेसिपीचा विचार करत असाल तर भरीत तुम्ही थोड्या वेगळ्या अंदाजात तयार करू शकता. जाणून घेऊया वांग्याचं झटका भरीत तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- एक वाटी भाजलेल्या वांग्याचे छोटे तुकडे
- कांदे- टोमॅटो चिरुन
- आलं चिरुन
- हिरव्या मिरच्या चिरुन
- बारीक चिरलेला कांदा एक वाटी
- जिरे
- मसाला
- मीठ चवीनुसार
- तेल
- सुक्या खोबऱ्याचा किस
कृती :
- कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करा.
- त्यात जिऱ्याची फोडणी देऊन कांदा, टोमॅटो आणि इतर सर्व पदार्थ एकदम घालून एक वाफ काढा.
- वांग्याचे तुकडे घालून परतून घ्या.
- त्यानंतर वरून खोबऱ्याचा किस घालून सर्व्ह करा.