खमंग असे मक्याचे ठेपले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:24 PM2018-12-23T19:24:28+5:302018-12-23T19:25:31+5:30
सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटकमटक पदार्थाची गरज असते. अशातच रोज काय वेगळं करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जवळपास सर्वचजण सहज आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थाच्या शोधात असतात.
सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटकमटक पदार्थाची गरज असते. अशातच रोज काय वेगळं करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जवळपास सर्वचजण सहज आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थाच्या शोधात असतात. अशातच तुम्ही हटके असे मक्याचे ठेपले ट्राय करू शकता. जाणून घेऊया खमंग अशा मक्याच्या ठेपल्यांची रेसिपी...
साहित्य :
500 ग्रॅम मक्याचे पीठ
100 ग्रॅम तांदळाची पिठी
ओवा
जिरेपूड
तिखट
1 चमचा धनेपूड
हिंग
मीठ चवीनुसार
1 कप तेल
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
- सर्वप्रथम तांदूळ आणि मक्याच्या पिठाला एकत्र करून चाळून घ्या.
- आता सर्व मसाले पिठामध्ये एकत्र करा.
- आता पिठात पाणी टाकून मळून घ्यावं आणि ठेपले तयार करावे.
- तयार ठेपल्यांवर झाकण ठवून मंद आचेवर भाजून घ्यावेत.
- ठेपले खमंग भाजल्यावर टॉमेटो सॉससोबत सर्व्ह करा.