नाश्त्यासाठी गरमागरम पनीर पराठा; नक्की ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 07:42 PM2018-10-31T19:42:09+5:302018-10-31T19:43:06+5:30

पनीर पराठा एक स्वादिष्ट आणि अगदी सहज करता येणारी रेसिपी आहे. खासकरून पंजाबमधील खाद्यप्रकार फार लोकप्रिय आहे. मुख्यतः हा पदार्थ नाश्त्यासाठी खाण्यात येतो.

Receipe Of Paneer Paratha | नाश्त्यासाठी गरमागरम पनीर पराठा; नक्की ट्राय करा!

नाश्त्यासाठी गरमागरम पनीर पराठा; नक्की ट्राय करा!

googlenewsNext

पनीर पराठा एक स्वादिष्ट आणि अगदी सहज करता येणारी रेसिपी आहे. खासकरून पंजाबमधील खाद्यप्रकार फार लोकप्रिय आहे. मुख्यतः हा पदार्थ नाश्त्यासाठी खाण्यात येतो. ही नॉर्थ इंडियन पराठा रेसिपी बटर आणि दह्यासोबत खाण्यात येते आणि ती चवीला फार सुंदर लागते. ही रेसिपी मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. 

साहित्य :

  • ½ कप गव्हाचं पीठ
  • 1 टीस्पून गरम मसाला पावडर
  • मीठ चवीनुसार
  • ½ कप मैदा
  • ½ टीस्पून हळद पावडर
  • 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर
  • ½ टीस्पून जीरं
  • 200 ग्रॅम पनीर
  • 4 टीस्पून किसलेलं खोबरं
  • 3 टेबलस्पून तूप
  • 1 ½ टेबलस्पून तेल
  • 1 ½ टीस्पून धने पावडर
  • 1 बारिक चिरलेली कोथिंबीर


कृती :

- पनीर पराठा तयार करण्यासाठी एका ताटामध्ये मैदा, गव्हाचं पीठ, मीठ आणि तूप एकत्र करून पिठ मळून घ्या. थोडा वेळासाठी बाजूला ठेवा. 

- एका फॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करत ठेवा. त्यानंतर थोडं जीरं टाका. जीरं तडतडल्यानंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं, पनीर कुस्करून, चवीनुसार मीठ, हळद एकत्र करून घ्या. एक मिनिटापर्यंत शिजवल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून मिश्रण एकत्र करून घ्या. त्यानंतर वरून बारिक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. तायर मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावं. 

- पिठाचा एक छोटासा तुकडा घेऊन लाटण्याच्या मदतीने छोटी पुरी लाटून घ्या. त्यामध्ये पनीरचं मिश्रण टाकून व्यवस्थित गोळा तयार करून लाटून घ्या. 

- तयार पराठा तव्यावर भाजून घ्या. वरून तूप लावा.

- दही किंवा कोशिंबिरीसोबत गरम गरम पनीर पराठा सर्व्ह करा. 

Web Title: Receipe Of Paneer Paratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.