स्वादिष्ट असा अननसाचा हलवा आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:31 PM2019-04-12T19:31:55+5:302019-04-12T19:34:25+5:30
अननस एक असं फळ आहे, जो अनेक व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असतो. यांमध्ये मिनरल्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरतं.
(Image Credit : WeRecipes)
अननस एक असं फळ आहे, जो अनेक व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असतो. यांमध्ये मिनरल्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरतं. या सर्व सकारात्मक गोष्टींव्यतिरिक्त यांमध्ये कॅलरीही कमी असतात. डायबिटीजवर अनेक संशोधनं करण्यात आली. त्या संशोधनांनुसार, फायबरयुक्त डाएट घेतल्याने फक्त ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत मिळत नाही तर, त्यामुळे कोलेस्ट्रॉलही कमी होते. एवढचं नाही तर पोटाच्या समस्याही दूर होतात. अशातच डाएट वजन नियंत्रित करण्यासाठी अननस लाभदायक ठरतं. कारण यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरल्यासारखं वाटतं. तसेच फॅट कमी करण्यासाठीही मदत होते.
साहित्य :
- अननसाचे लहान तुकडे
- खवा
- दूधाची साय किंवा क्रीम
- साखर
- तूप
- केशर
- पाणी
- काजू आणि बदामाचे पातळ काप
कृती :
- सगळ्यात आधी साखरेत पाणी घालून दोन तारी पाक मंद आचेवर तयार करा. त्यानंतर त्या पाकामध्ये अननसाचे तुकडे एकत्र करून शिजवून घ्यावा.
- गरम पाण्यामध्ये केशर भिजत ठेवा. अननसाचा पाक आळल्यानंतर मिश्रण घट्ट होऊ लागतो.
- केशर वापरायचे असल्यास त्यामध्ये एकत्र करावे.
- एका पातेल्यामध्ये तूप घालावे, तूप तापल्यानंतर अननसाचे मिश्रण घालून परतून घ्यावं.
- मिश्रणामध्ये खवा कुस्करून घालून एकत्र करावं.
- शिजल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स एकत्र करावे.
- गोड गोड अननसाचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.