असा बनवा झटपट होणारा हेल्दी ओटसचा डोसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:57 PM2018-08-16T12:57:26+5:302018-08-16T13:00:26+5:30

मसाला ओटस किंवा दुधात ओटस घालून खाण्याचा कंटाळा आला असेल तर आम्ही दिलेला ओटसचा डोसा नक्की ट्राय करा. 

Receipe of quick, healthy oats dosa | असा बनवा झटपट होणारा हेल्दी ओटसचा डोसा 

असा बनवा झटपट होणारा हेल्दी ओटसचा डोसा 

Next

पुणे : सतत फास्टफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, रात्रीचे जागरण, खाण्याच्या अनियमित वेळा यामुळे अनेकदा स्थूलपणाचा सामना करावा लागतो. अशावेळी सकाळच्या नाष्ट्याला ओटस खाण्याचा सल्ला दिला जातो. ओटसमुळे भूक तर भागतेच पण शरीरात मेद साठत नाही. पण मसाला ओटस किंवा दुधात ओटस घालून खाण्याचा कंटाळा आला असेल तर आम्ही दिलेला ओटसचा डोसा नक्की ट्राय करा. 

कृती :

ओटस दीड वाटी 

भिजवून मोड आलेले हिरवे मूग एक वाटी

ताक 

मिरच्या २ ते ३ 

लसूण पाकळ्या २ ते ३

जिरे अर्धा चमचा 

तांदूळ पीठ एक चमचा 

मीठ 

तेल 

पाणी 

कृती :

ओटस मिक्सरवर बारीक करून घ्या. हे ओटसचे पीठ दोन वाटी ताकात टाकून एकजीव करा. 

मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, दोन ते तीन लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, मीठ घालून एकत्र वाटा.हे मिश्रणही ताकात एकत्र करा. 

एक चमचा तांदुळाचे पीठही या मिश्रणात घाला.तांदूळ पिठीमुळे डोसा कुरकुरीत होतो. 

या सर्व मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून डोश्याप्रमाणे सरसरीत पीठ करून दहा मिनिटे बाजूला ठेवा. 

नॉनस्टिक पॅन'ला तेल लावून त्यावर मिश्रणाचा डोसा करा. आरोग्यदायी, झटपट होणारा, कुरकुरीत डोसा तयार.

 हा डोसा नुसताही उत्तम लागतो. तसा आवडत नसेल तर ओल्या नारळाच्या चटणी, लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करता येईल. 

हा डोसा डब्यातही देता येतो. मात्र गार झाल्यावर डब्यात भरावा अन्यथा डोसे एकमेकांना चिकटून गोळा होऊ शकतो. 

Web Title: Receipe of quick, healthy oats dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.