तोंडाला पाणी आणणारी सिताफळ बासुंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:21 PM2018-10-08T16:21:39+5:302018-10-08T16:22:58+5:30
सध्या सिताफळांचा सीझन सुरू झाला आहे. अशातच बाजारातही सिताफळापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे.
सध्या सिताफळांचा सीझन सुरू झाला आहे. अशातच बाजारातही सिताफळापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. पण प्रत्येकवेळी बाजारातून हे पदार्थ विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने तुम्ही सिताफळाचा वापर करून एखादा पदार्थ तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी सिताफळ बासुंदी तयार करण्याची सोपी पद्धत...
साहित्य :
- दूध १ १/२ (अर्धा) लीटर
- सीताफळ १
- साखर १/२ (अर्धा) कप
- केशर
कृती :
- सिताफळाचा गर काढून फ्रिजमध्ये ठेवा.
- एका कढईमध्ये दूध उकळून घ्या. दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्या.
- दूध आटल्यानंतर त्यामध्ये साखर टाका आणि व्यवस्थित एकत्र करून थंड होण्यासाठी ठेवून द्या.
- सिताफळाचा गर स्मॅश करून दूधामध्ये मिक्स करून केशर टाका.
- थंडगार बासुंदी खाण्यासाठी तयार आहे.