चटपटीत खमंग वांग्याची भाकरी; एकदा खाल तर अजून मागाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 04:35 PM2019-02-01T16:35:11+5:302019-02-01T16:37:01+5:30
हिवाळ्याच्या मध्यावर बाजारांमध्ये वांग्याची आवाक वाढते. त्यामुळे सहाजिकच स्वयंपाकघरातही वांग्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे बेत आखण्यात येतात.
हिवाळ्याच्या मध्यावर बाजारांमध्ये वांग्याची आवाक वाढते. त्यामुळे सहाजिकच स्वयंपाकघरातही वांग्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे बेत आखण्यात येतात. पण तेच भरीत आणि वांग्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक हटके रेसिपी आहे. अगदी कमी वेळात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही सहज ही रेसिपी तयार करू शकता. जाणून घेऊया वांग्याची भाकरी तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
साहित्य :
- एक मोठं वांगं
- बाजरीचं पीठ
- ज्वारीचं पीठ
- तांदळाचं पीठ
- तिखट
- मीठ चवीनुसार
- धणेपूड
- चार चमचे कणीक
- तेल
कृती :
- वांगं भाजून त्याचं साल काढा.
- चमच्याने वांग्याचा गर कालवा.
- त्यात मीठ, तिखट, धणेपूड घाला. दोन चमचे तेल घाला.
- यात पीठ घालून एकत्र मळा.
- प्लास्टिकच्या कागदाला थोडं तेल लावा व त्यावर या पिठाची छोटीशी भाकरी थापा.
- तव्यावर दोन्ही बाजूंनी भाकरी व्यवस्थित भाजून घ्या.
- गरम-गरम लोण्याबरोबर खायला द्या.