झटपट तयार करा कुरकुरीत केळ्याचे वेफर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:33 PM2018-11-11T14:33:03+5:302018-11-11T14:34:50+5:30
उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक. पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स. वेफर्समध्येही अनेक पर्याय आढळून येतात. त्यातल्यात्यात सर्वांना आवडणाऱ्या वेफर्स म्हणजे केळा वेफर्स.
उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक. पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स. वेफर्समध्येही अनेक पर्याय आढळून येतात. त्यातल्यात्यात सर्वांना आवडणाऱ्या वेफर्स म्हणजे केळा वेफर्स. प्रवासादरम्यान, मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी किंवा मग चहासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे केळा वेफर्स. अनेकदा बाजारातून विकत आणून वेफर्स खाल्या जातात. परंतु तळण्यासाठी लागणारं तेल, वेफर्स बनवण्याची जागा याबाबत आपल्या मनात अनेक शंकाकुशंका उपस्थित होतात. त्यामुळे आपण वेफर्स खाणंच टाळतो. अशावेळी वेफर्स घरी तयार करणं हा उत्तम पर्याय आहे. अगदी सहज आणि कमी वेळात या वेफर्स तुम्ही घरी तयार करू शकता.
केळयाचे वेफर्स तयार करण्यासाठी साहित्य :
- कच्ची केळी
- शेंगदाण्याचं तेल
- मीठ चवीनुसार
- सैंधव मीठ
कृती :
- सर्वात आधी कच्च्या केळ्यांची साल काढून घ्या.
- एका बाउलमध्ये बर्फांचं पाणी घेऊन त्यामध्ये सैंधव मीठ मिक्स करा आणि त्यामध्ये केळी 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
- केळी पाण्यातून बाहेर काढून चिप्सच्या आकारात कापून स्वच्छ कपड्यावर 10 मिनिटांसाठी पसरवून ठेवा. त्यामुळे त्यामध्ये असलेलं पाणी सुकून जाईल.
- आता कढईमध्ये तेल घ्या आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये केळीचे काप टाकून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- केळी वेफर्स तयार आहे. वरून थोडंसं मीठ टाकून तळून घ्या.
- तयार वेफर्स एका एअरटाइट डब्ब्यामध्ये पॅक करून ठेवले तर बरेच दिवस टिकू शकतात.