आंब्याच्या सीझनमध्ये तयार करा गोडगोड आंबावडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 02:44 PM2019-04-24T14:44:54+5:302019-04-24T14:47:00+5:30
उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन असून फळांच्या राजाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत आंब्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ चाखयाची संधी मिळते.
उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन असून फळांच्या राजाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत आंब्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ चाखयाची संधी मिळते. घराघरांमध्ये आमरस-पुरी, आंब्याचा शिरा, मँगो लस्सी यांसारख्या पदार्थांचा घाट घातला जातो. याशिवाय आंब्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात येतात.
आंब्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, जिंक सेलेनियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्सही असतात. आंब्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्याही आंब्यामुळे दूर होतात.
आंबा वडी हे आंब्यांच्या दिवसांमध्ये बनविण्यासाठी एक खूपच चविष्ट मिष्टान्न आहे. परंतु ह्या वडीसाठी ताजा किंवा फ्रोजन मँगो क्रश वापरला तरि काही हरकत नाही. म्हणूनच त्यामुळे ही आंबा वडी वर्षभरात कधीही बनविता येईल. ही वडी तयार करण्यासाठ तुम्ही खवा किंवा दूध वापरू शकता. पण ही वडी जास्त दिवस ठेवता येणार नाही.
साहित्य :
- आंब्याचा रस
- साखर
- पिठीसाखर
- तूप
- बदामाचे काप किंवा ड्रायफ्रुट्स
कृती :
- एका भांड्यामध्ये आंब्याचा रस आणि साखर एकत्र करून घ्या.
- गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये हे मिश्रण घट्ट होइपर्यंत ढवळत राहावे.
- त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्यावे.
- मिश्रण थंड झाल्यावर पिठीसाखर एकत्र करून घ्यावे.
- मिश्रण जरा कोरडे होइपर्यंत आणि लाटता येइपर्यंत एकत्र करावे.
- मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर किंवा लाटटा येण्यासारख्या पृष्ठभागावर ठेवावा.
- लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यावं. त्यानंतर वर ड्रायफ्रुट्स घालून त्याच्या वड्या पाडाव्यात.
- गोड गोड आंबावडी खाण्यासाठी तयार आहे.