''ठंडा ठंडा कूल कूल'' अनुभव देणारे ''पुदिना सरबत''
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:00 PM2019-03-25T17:00:42+5:302019-03-25T17:03:41+5:30
सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही.
पुणे : ''ऊन जरा जास्त आहे, असं दरवर्षी वाटत'' या ओळी आठवल्यावर डोळ्यासमोर येतो तो पावसाळा. धुंद वातावरण आणि पावसाच्या सरी, आजूबाजूला पसरलेली हिरवळ, पण हे वातावरण आता कुठे ? सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही. पहिल्याच घोटात शीतलतेचा अनुभव देणारे हे सरबत नक्की करा.
साहित्य :
पुदिना एक जुडी
पाणी
लिंबू
साखर
मीठ
जिरेपूड
बर्फ
कृती :
- थंड पाण्यात साखर विरघळून त्या. त्यात लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घाला.
- मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने (काड्या, देठ घेऊ नये), आठ ते दहा बर्फाच्या क्यूब एकत्र करून फिरवा.
- झाकण उघडून या मिश्रणात एक चमचा जिरे घाला.
- हे सर्व मिश्रण गाळून घ्या.
- आता तयार मिश्रण साखरेच्या पाण्यात घालून थंड करून सर्व्ह करा पुदिन्याचे सरबत.
- हे सरबत शरीरासाठी अतिशय थंड आहे. त्यात आवडत असल्यास निम्मी साखर आणि निम्मा गुलकंद घालून एकजीव करा.
- त्यामुळे त्यातील थंड गुणधर्म वाढेल. उन्हाळी लागली असल्यास दर दोन तासांनी हे सरबत अर्धा ग्लास प्यावे.