पावसाळी हवेत करा अशी गरमागरम दाल-खिचडी !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:17 PM2019-04-15T18:17:50+5:302019-04-15T18:19:26+5:30
कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी आणि चवदार दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर बघूया या पदार्थाची पाककृती.
Next
पुणे : अवकाळी पावसामुळे सध्या पुण्यात गारवा निर्माण झाला आहे. अशावेळी गरमागरम दाल- खिचडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फक्त पावसाळ्यात नाही तर कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी आणि चवदार दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर बघूया या पदार्थाची पाककृती.
साहित्य :
तांदूळ कोणताही (शक्यतो जुना घ्या)
तुरीची डाळ पाव वाटी
तूप किंवा तेल (आवडीनुसार)
हळद
मोहरी
जिरे
हिंग
लसूण पाकळ्या आठ ते दहा
कढीपत्ता
कोथिंबीर
मीठ
दोन लाल मिरच्या
पाणी
कृती :
- तांदूळ आणि डाळ दोनवेळा पाण्यात धुवून १० मिनिट वेगवेगळे भिजवा.
- गॅसवर तीन वाट्या पाणी उकळून घ्या.
- चमचाभर तेल किंवा तुपात तांदूळ आणि डाळ परतून घ्या.
- आत त्यात चिमूटभर हळद आणि दोन लहान चमचे मीठ घाला.
- आता ही खिचडी तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.
- ही खिचडी पळीने घोटून एकजीव करून घ्या.
- पळीमध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालून गरम करा.
- त्यात मोहरी तड्तडवून घेऊन जिरे घाला.
- आता त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि निम्मी कोथिंबीर चिरून घाला.
- आता या फोडणीत पाव चमचा हिंग घाला आणि जळण्याच्या आधी ही फोडणी खिचडीवर घाला.
- आता उरलेली कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करा 'पौष्टिक दाल-खिचडी'.