नको उडीद डाळ ना पीठ भिजवण्याची कटकट ; काही मिनिटात होतील घावणे फटाफट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:57 PM2020-01-20T17:57:53+5:302020-01-20T18:00:14+5:30

काही दिवसांची ही प्रक्रिया टाळून अगदी काही तासातही त्याच तोडीची घावण बनू शकतात. चला तर बघूया या घावणांची पाककृती. 

recipe of easy Ghavane or Dosa | नको उडीद डाळ ना पीठ भिजवण्याची कटकट ; काही मिनिटात होतील घावणे फटाफट 

नको उडीद डाळ ना पीठ भिजवण्याची कटकट ; काही मिनिटात होतील घावणे फटाफट 

googlenewsNext

 पुणे : अनेकदा घावणे करायचे म्हटल्यावर आधी तांदूळ आणि डाळ भिजवा, ते वाटा आणि मग आंबवा अशी सगळी प्रक्रिया पार पाडावी लागते. असे झाले तरच चवदार, हलकी आणि जाळीदार घावणे बनतात. मात्र काही दिवसांची ही प्रक्रिया टाळून अगदी काही तासातही त्याच तोडीची घावण बनू शकतात. चला तर बघूया या घावणांची पाककृती. 

साहित्य :

2 वाट्या जाडे तांदुळ 

1 वाटी मुगडाळ 

जिरे पूड पाव चमचा 

 मीठ  

तेल 

इनो अर्धा चमचा 

कृती :

  • तांदूळ आणि मुगडाळ दोन पाण्यातून धुवून घ्या. 
  • आता दोन्ही मुख्य पदार्थ अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घाला. 
  •  दोन्ही पदार्थ थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. 
  •  हे दोन्ही पीठ मोठ्या पातेल्यात एकत्र करून करून त्यात मीठ, जिरे पूड, चमचाभर तेल आणि अर्धा ग्लास पाणी घालून एकत्र करून घ्या. 
  • घावणे करण्याच्या आधी वाटणात इनो घालून एकजीव करा आणि तात्काळ नॉन स्टिक पॅनवर तेलाचा हात फिरवून जाळीदार घावणे तयार करा. 
  • ही घावणे ओल्या नारळाची चटणी, शेजवान सॉस सोबत छान लागतेच पण बटाटा भाजी किंवा इतर कोणत्याही भाजीसोबतही पोळीऐवजी खाता येतात. 

(एका वेळी तीन घावणांपुरते पीठ घेऊन त्यात पाव चमचा इनो घाला. इनो ऐनवेळी घाला. सगळे एकदम घातल्यास पुढच्या घावणांना जाळी पडणार नाही)

Web Title: recipe of easy Ghavane or Dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.