घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने तयार करा बीटाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 14:15 IST2018-09-07T14:14:04+5:302018-09-07T14:15:02+5:30
चवदार, आरोग्यदायी आणि गोड हलवा तयार करण्यासाठी खालील साहित्य आणि कृती वापरून सणासुदीसाठी एक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने तयार करा बीटाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!
आवश्यक साहित्य -
बीट - 2 (300 ग्रॅम), तूप, साखर - अर्धा कप (100 ग्रॅम), काजू - 10 ते 12 (बारिक तुकडे केलेले), बदाम 8 ते 10 (बारिक तुकडे केलेले), दूध 300 मिली, मनुके 1 टेबल स्पून, 5 ते 6 वेलची.
कृती -
बीट चांगले धुवून साल काढून किसून घ्या. पॅन गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप टाका. तूप विरघळल्यावर त्यामध्ये बारिक तुकडे केलेले बदाम आणि काजू टाकून भाजून घ्या. भाजलेला सुका मेवा प्लेटमध्ये काढून घ्या.
पॅनमध्ये 1 चमचा तूप टाका. त्यानंतर त्यामध्ये बारिक किसलेलं बीट टाका. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्या. 3 मिनिटांपर्यंत शिजवल्यानंतर त्यामध्ये दूध घालून मिक्स करा. त्यावर झाकण ठेवून मध्येम आचेवर शिजवून घ्या.
झाकण काढून थोडा वेळ मध्यम आचेवर हलवा शिजवून घ्या. यादरम्यान हलवा घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. बीटाचं मिश्रण नरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर एकत्र करा. त्यामध्ये मनुके टाका. साखर वितळून मिश्रण एकजीव होईपर्यंत एकजीव करत रहा.
मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये सुका मेवा टाका, वेलचीची पूड टाकून मिक्स करून घ्या. साधारणतः 20 मिनिटांनी हलवा खाण्यासाठी तयार होईल.