सायंकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे खमंग कचोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:33 PM2018-10-29T13:33:43+5:302018-10-29T13:35:57+5:30

चहासोबत खाण्यासाठी कचोरी असेल तर चहा पिण्याची मजा काही औरच. अनेकदा आपण एखाद्या हलवाईच्या दुकानातून कचोरी आणून आपली हौस भागवतो.

recipe of kachori | सायंकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे खमंग कचोरी!

सायंकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे खमंग कचोरी!

Next

चहासोबत खाण्यासाठी कचोरी असेल तर चहा पिण्याची मजा काही औरच. अनेकदा आपण एखाद्या हलवाईच्या दुकानातून कचोरी आणून आपली हौस भागवतो. पण हीच मस्त कुरकुरीत कचोरी तुम्ही घरच्या घरीही तयार करू शकता. अगदी सहज करता येणारी ही कचोरी मुलांनाही आवडेल. जाणून घेऊयात कचोरी तयार करण्याची रेसिपी... 

साहित्य : 

  • मैदा चार वाट्या 
  • मीठ
  • हिंग
  • मटार दाणे एक वाटी
  • फरसबी बारीक चिरुन पाच वाटी
  • गाजर बारीक चिरुन पाव वाटी
  • मिरच्यांचे गोल काप
  • धणे पूड दीड चमचा
  • लिंबाचा रस  
  • साखर 
  • छोले मसाला दीड चमचा
  • तेल
  • जिरे
  • हळद
  • तीळ एक चमचा
  • सोयासॉस


कृती : 

- चार चमचे तेल गरम करावं. त्यात जिरे, हळद, तीळ, मिरच्या घालाव्यात. नंतर मटार दाणे, गाजर तुकडे, फरसबीचे तुकडे घालून पाच मिनिटे परतून घ्यावं. 

- हे मिश्रण मिक्सरमधून बारिक करून घ्यावं. 

- लिंबाचा रस, मीठ, साखर, छोले मसाला व धणे पूड घालून या सारणाचे छोटे गोळे करावेत. 

- ते सोया सॉसमध्ये बुडवून काढावेत. मैद्यात मीठ घालावं. तो पाणी घालून पातळसर भिजवावा. 

- या भिजवलेल्या मैद्याच्या पेस्टमध्ये सॉसमध्ये बुडवलेले सारणाचे गोळे बुडवून घ्यावेत. 

- गरम तेलात मंद आचेवर तळावेत.

- गरमगरम खमंग कचोरी खाण्यासाठी तयार आहे. 

Web Title: recipe of kachori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.