जांभळाच्या चटणीमुळे जेवण होईल चटकदार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 05:46 PM2019-07-13T17:46:39+5:302019-07-13T17:47:11+5:30
आपण कोणत्याही स्नॅक्ससोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी सर्व्ह करतो. तिच तिच चटणी खाऊन कंटाळा आला असेल ना? आज आम्ही तुम्हाला थोडीशी हटके रेसिपी सांगणार आहोत.
आपण कोणत्याही स्नॅक्ससोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी सर्व्ह करतो. तिच तिच चटणी खाऊन कंटाळा आला असेल ना? आज आम्ही तुम्हाला थोडीशी हटके रेसिपी सांगणार आहोत. पावसाळ्यामध्ये जांभूळ हमखास मिळतात. जांभळापासून जॅम, जेली आइस्क्रिम यासर्व पदार्थांव्यतिरिक्त चटणीही तयार करू शकता.
जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच डायबिटीस, कॅन्सरसोबतच वजन कमी करण्यासाठीही जांभूळ उपयोगी ठरतं. असं बहुगुणी जांभूळ नुसतं खाणं आवडत नसेल तर तुम्ही यापासून हटके पदार्थही तयार करू शकता. जाणून घेऊया जांभळाची चटणी तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- जांभूळ
- मध
- आलं
- बारिक कापलेल्या मिरच्या
- मीठ
- काळी मिरी पावडर
- कोथिंबीर
जांभळाची चटणी तयार करण्याची कृती :
- जांभळाच्या बिया काढून घ्या.
- मिक्सरमध्ये जांभूळ, मध, आलं, हिरवी मिरची आणि दोन चमचे पाणी एकत्र करून व्यवस्थित वाटून घ्या.
- मीठ आणि काळी मिरी एकत्र करून वाटून घ्या.
- जांभळाची चटणी तयार आहे.
- एका बाउलमध्ये चटणी काढूव थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.