जुनं ते सोनं : आजीची आठवण देणारी 'ताकातली भेंडीची भाजी'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:53 PM2018-10-04T17:53:15+5:302018-10-04T17:55:07+5:30
आजीची आठवण करून देणाऱ्या या रेसिपीला पुन्हा दिलेला उजाळा.
Next
पुणे : दिवसेंदिवस नवनवे पदार्थ रूढ होताना अनेकदा जुन्या पदार्थांचा मात्र विसर पडतो आहे. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे ताकातली भेंडीची भाजी. आजीची आठवण करून देणाऱ्या या रेसिपीला पुन्हा दिलेला उजाळा.
साहित्य :
पोपटी रंगाची लांबट भेंडी पाव किलो (नसल्यास साधी घ्यावी)
दोन वाट्या ताक
दाण्याचा कूट किंवा ओले खोबरे दोन लहान चमचे
मिरची ठेचा अर्धा चमचा
लसूण दोन पाकळ्या
तांदुळाचे पीठ एक लहान चमचा
हळद
मोहरी
मीठ
तेल
कृती :
- भेंडी नेहमीप्रमाणे गोल चिरून घ्या. फार पातळ चकत्या करू नये. त्यामुळे भाजी चिकट होते.
- कढईत तेल तापवून मोहरी त्यात लसूण बारीक चिरून परता. लसूण सोनेरी झाल्यावर त्यात मिरचीचा ठेचा घाला.
- आता त्यात भेंडी घालून परता.त्यावर मीठ आणि हळद घालून व्यवस्थित भाजी करून घ्या.
- भाजी शिजत आल्यावर गॅस बारीक करून त्यात ताक घाला.
- त्यात दाण्याचा कूट किंवा खोबरे घालून ढवळा.
- आता यात तांदुळाचे पीठ घालून एक उकळी काढून गॅस बंद करा.
- ही भाजी फार घट्ट किंवा पातळ नसते. अतिशय चवदार लागणारी अशी भाजी नक्की करून बघा.