खायला चटपटीत आणि बनवायला सोपे असे मसाला कॉर्न फ्राइज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 01:15 PM2019-08-21T13:15:52+5:302019-08-21T13:20:22+5:30
आतापर्यंत मक्याचं कणीस आपण भाजून किंवा उकडून खातो. त्यातल्यात्यात वेगळं म्हणून आपण त्याचे दाणे काढून कॉर्न चाट किंवा कॉर्न मसाला यांसारखे पदार्थ तयार करून खातो.
आतापर्यंत मक्याचं कणीस आपण भाजून किंवा उकडून खातो. त्यातल्यात्यात वेगळं म्हणून आपण त्याचे दाणे काढून कॉर्न चाट किंवा कॉर्न मसाला यांसारखे पदार्थ तयार करून खातो. अनेकांना शेगडीवर भाजून लिंबू पिळलेलं मक्याचं कणीस खायला फार आवडतं. पण आज आम्ही तुम्हाला मक्याची एक खास रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी थोडीशी वेगळी असून तुम्हाला नक्की आवडेल.
आतापर्यंत तुम्ही बटाट्याचे फ्रेच फ्राइज खाल्ले असतील पण तुम्ही कधी मसाला कॉर्न फ्राइज ट्राय केले आहेत का? ही क्लासी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. कमी वेळात तयार होणारी ही हटके रेसिपी घरातील लहान मुलांसोबतच थोरामोठ्यांना फार आवडेल.
मसाला कॉर्न रेसिपी...
साहित्य :
- मक्याचं कणीस
- मक्याचं पीठ
- तांदळाचं पीठ
- काळी मिरी पावडर
- लाल मीरची पावडर
- आमचूर पावडर
- लसणाची पावडर
- जिऱ्याची पावडर
- चाट मसाला
- लिंबू
- तेल
- मीठ
- टूथपिक्स
- पाणी
कृती :
- सर्वात आधी एक मक्याचं कणीस घेऊन त्याचे टूथपिकपेक्षा एक सेंटिमीटर कमी आकाराचे तुकडे करावे.
- त्यानंतर कापलेल्या मक्याच्या कणासाचे उभे दोन तुकडे करा.
- तुकड्यांमध्ये मक्याच्या दाण्यांच्या रेषा दिसतील. त्या रेषांमध्ये एक-एक करून टूथपिक रोवून प्रत्येक भाग वेगवेगळा करून घ्या.
- एका पॅनमध्ये पाणी उकळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये टूथपिक रोवून तयार केलेले प्राइज 2 ते 3 मिनिटं उकडून थंड करून घ्या.
- थंड झालेले फ्राइज एका बाउलमध्ये घ्या. त्यामध्ये मक्याचं पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, काळी मिरी पावडर एकत्र करून घ्या. त्यानंतर सेट होण्यासाठी प्रिजरमध्ये 15 मिनिटांसाठी ठेवा.
- एका पॅनमध्ये तेल गरम करून प्राइज त्यामध्ये तळून घ्या.
- त्यानंतर एका बाउलमध्ये लाल मीरची पावडर आमचूर पावडर, लसणाची पावडर, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या.
-तळलेले फ्राइज एका प्लेटमध्ये काढून त्यावर मसाल्यांचं मिश्रण टाका. वरून लिंबू पिळा.
- गरमा-गरम मसाला कॉर्न फ्राइज खाण्यासाठी तयार आहेत.
- तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत कॉर्न फ्राइज सर्व्ह करू शकता.