पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 05:49 PM2019-06-05T17:49:34+5:302019-06-05T17:51:47+5:30

पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ  समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी.

Recipe of Puran poli Mango Ice Cream | पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा !

पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा !

googlenewsNext

पुणे : पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ  समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी. तेव्हा आंब्याचा सिजन संपण्याच्या आत हे आईस्क्रीम करायला विसरू नका. 

साहित्य:

  • २ वाटी व्हीप क्रीम किंवा फ्रेश क्रीम
  • १ वाटी कंडेन्स्ड मिल्क
  • अर्धी वाटी मिल्क पावडर
  • ४-५ चमचे साखर
  • एका पातळ पुरणपोळीचा चुरा
  • ४ चमचे हापूस आंब्याच्या रस
  • २ चमचे साजूक तूप

 

कृती:

पहिल्यांदा व्हीप क्रीम किंवा फ्रेश क्रीम,कंडेन्स्ड मिल्क,मिल्क पावडर आणि साखर हे सर्व हँड ब्लेंडर किंवा मिक्सरमधे एकजीव करून घ्या. 

हे सर्व आता एका एअर टाईट कंटेनरमधे टाकून २ तास फ्रीजरमध्ये ठेवा. 

 पुन्हा एकदा अर्धवट सेट झालेलं आईस्क्रीम मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. 

आता हे सर्व आईस्क्रीम बाऊलमध्ये  काढून घ्या. 

नंतर त्यात पुरणपोळीचा चूरा, आमरस आणि साजूक तूप टाकून व्यवस्थित एकत्र करून हवाबंद डब्यात  ५-६ तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. 

आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाल्यावर थोडा पुरणपोळीचा चुरा आणि बारीक चमचाभर साजूक तूप घालून सर्व्ह करा पुरणपोळी आमरस आईस्क्रीम. 

Web Title: Recipe of Puran poli Mango Ice Cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.