Tasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 04:49 PM2020-01-23T16:49:44+5:302020-01-23T17:04:10+5:30

Spinach Soup : सध्या बाजारात पालकाची भाजी मुबलक उपलब्ध आहे. हिरव्यागार पालकाची भाजी किंवा पराठे करण्यापेक्षा त्याचे चवदार सूपही करता येऊ शकते. थंडीत सगळ्यांना आवडेल अशी पालकाच्या सूपची ही पाककृती.

Recipe of spinach soup | Tasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप

Tasty Palak Soup Recipe : हिवाळ्यात फायदेशीर खूप ; करा पालकाचे गरमागरम सूप

googlenewsNext

सध्या बाजारात पालकाची भाजी मुबलक उपलब्ध आहे. हिरव्यागार पालकाची भाजी किंवा पराठे करण्यापेक्षा त्याचे चवदार सूपही करता येऊ शकते. थंडीत सगळ्यांना आवडेल अशी पालकाच्या सूपची ही पाककृती. तेव्हा नक्की करून बघा पालकाचे सूप. 

साहित्य :

पालकाची जुडी एक 

मध्यम आकाराचा कांदा 

लसूण पाकळ्या तीन 

आलं अर्धा इंच 

चार ते पाच मिऱ्यांची पूड 

मीठ 

कॉर्नफ्लोअर एक चमचा 

बटर किंवा क्रीम (आवडत असल्यास )

कृती :

- ताजी पालकाची पाने आणि कोवळे देठही तोडून, धुवून घ्यावेत. 

-कुकरमध्ये पाणी, त्यात चिमूटभर मीठ घालून, त्यात मध्यम उभा चिरलेला कांदा, लसूण टाकून दोन शिट्ट्या घ्या. 

-कुकर थंड झाल्यावर सर्व मिश्रण मिक्सरमधून एक जीव होईपर्यंत वाटून घ्या.  

-कढईत चमचाभर बटर घालून त्यात पालकाचे मिश्रण घालावे. त्यात दोन ग्लास पाणी ओतावे. 

- आता त्यात पाण्यात कालवलेले कॉर्नफ्लोअर घालून उकळी काढावी. 

-सर्वात शेवटी मीठ घालावे. 

-बाऊलमध्ये सूप देताना वरून चिमूटभर मिरपूड घालून द्यावे. 

-आवडत असल्यास फ्रेश क्रीमही घालता येईल.किंवा चीजही किसून घालू शकता. 

-हे सूप आजारी व्यक्ती किंवा डायट करणाऱ्या व्यक्तीही घेऊ शकतात. लहान मुलांनाही आवडते. 

-आवडत असल्यास ब्रेडचे तुकडेही तळून टाकता येतील. 

Web Title: Recipe of spinach soup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.