चविष्ठ आणि चटकदार टोमॅटो पकोडे घरी नक्की करून बघा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:51 PM2019-05-10T16:51:04+5:302019-05-10T16:51:51+5:30
उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला चव नसते. अशावेळी काहीतरी चटपटीत पण तरीही घरगुती खाण्याची इच्छा होते. तेच डोळ्यासमोर ठेवत आम्ही घेऊन आलो आहोत टोमॅटो पकोड्यांची रेसिपी. तेव्हा हे चटपटीत पकोडे नक्की करा
Next
पुणे : उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला चव नसते. अशावेळी काहीतरी चटपटीत पण तरीही घरगुती खाण्याची इच्छा होते. तेच डोळ्यासमोर ठेवत आम्ही घेऊन आलो आहोत टोमॅटो पकोड्यांची रेसिपी. तेव्हा हे चटपटीत पकोडे नक्की करा.
साहित्य :
टोमॅटो ३ (पिकलेले चालतील पण मऊ नकोत, जरा कडक घ्यावेत)
तांदळाचे पीठ १ मोठा चमचा
कॉर्नफ्लोअर १ लहान चमचा
बेसन पीठ १ मोठा चमचा
लाल तिखट
हळद
मीठ
तेल (टाळण्यासाठी)
चटणीसाठी साहित्य :
पुदिना १ जुडी
सुके खोबरे १ चमचा
हिरव्या मिरच्या तीन
लसणाच्या पाकळ्या २ ते ३
मीठ
कृती :
- टोमॅटोचे गोलाकार काप करून ते डिशमध्ये पसरवून एक तास पंख्याखाली किंवा उन्हात ठेवा. यामुळे पकोडे कुरकरीत होतात.
- बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात लाल तिखट, मीठ आणि हळद घालून घट्ट भिजवून घ्या.
- आता टोमॅटोचे काप (रिंग) भिजवलेल्या पीठातून काढून कोरड्या कॉर्नफ्लोअरमध्ये बुडवा आणि तापलेल्या तेलात तळून काढा.
- त्यावेळी आच मध्यम ठेवावी मात्र पकोडे टाकण्यापूर्वी तेल कडकडीत तापवावे.
- तपकिरी रंग आल्यावर पकोडे पेपरवर टाकून तेल निथळावे आणि पुदिना चटणीसोबत सर्व्ह करावेत.
चटणीची कृती :
- सर्व साहित्य चिरून एकत्र कौन मिक्सरला बारीक वाटून घ्या. आवडत असल्यास वरून फोडणीही देऊ शकता.