तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:56 PM2018-10-05T15:56:19+5:302018-10-05T15:56:37+5:30
भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत.
भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट असतात. परंतु, हा समज अत्यंत चुकीचा असून भातामध्ये कोणत्याही प्रकारचे फॅट्स नसतात. भात पचण्यास हलका असतो आणि कार्बोहायड्रेटही असतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात भात खात असाल तर सावध व्हा. कारण भातामध्ये एक असं रसायन असतं जे शरीरासाठी घातक असतं. या रसायनाचं नाव आहे आर्सेनिक. हे एक रासायनिक तत्व आहे ज्यामध्ये स्किन कॅन्सरसह अनेक गंभीर रोग होण्याच्या शक्यता असते.
आरोग्यासाठी घातक ठरतं आर्सेनिक रासायनिक तत्व
क्वीन यूनिवर्सिटी बेलफास्टमधील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, तांदूळ शिजवताना त्यामध्ये आर्सेनिक तयार होतं. वास्तविक पाहता धान्यामध्ये असं घातक रसायन असण्याचं कारण धान्यांवर फवारण्यात येणारी किटकनाशक असतात. यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अॅन्डी मेहरर्ग यांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तींच्या आहारात तांदळाचा समावेश जास्त असतो, त्यांनी या घातक रासायनिक पदार्थापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. बीबीसीच्या एका कार्यक्रमामध्ये प्रोफेसर अॅन्डी यांनी तांदूळ शिजवण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तांदळातील या रासायनिक पदार्थाची प्रभाव कमी केली जाऊ शकेल.
जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धीतीने बनवतात भात
प्रोफेसर अॅन्डी यांनी सांगितल्यानुसार, जास्तीत जास्त लोकं भात बनवण्यासाठी एका खास पद्धतीचा वापर करतात. तांदळामध्ये पाणी टाकून तोपर्यंत शिजवतात जोपर्यंत ते पाणी तांदळामध्ये पूर्णपणे शोषलं जात नाही. यामुळे तांदळातील आर्सेनिक कमी न होता ते तसेच रहाते.
भात तयार करण्यासाठी ही पद्धत वापरा -
- तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे तांदूळ फुगतो आणि त्यातील आर्सेनिक निघून जाण्यासाठी मदत होते.
- सकाळी तांदळातील पाणी फेकून द्या आणि स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्या.
- जेवढे तांदूळ आहेत त्यापेक्षा पाच पट अधिक पाणी घालून तांदूळ शिजवून घ्या.
- शिजलेला तांदूळ काढून घ्या आणि गरम पाण्याने धुवून घ्या.
- तुमचा भात आर्सेनिकशिवाय तयार आहेत.
- ही पद्धत थोडी वेळखाऊ असली तरीदेखील सुरक्षित आहे.