आंबट आहे की गोड कसं ओळखाल? आंबे खरेदी करण्याआधी 'ही' ट्रीक माहीत करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:17 AM2020-05-07T11:17:04+5:302020-05-07T11:22:37+5:30
चांगले आंबे निवडण्याची आणि साठवण्याची पध्दत सांगणार आहोत.
उन्हाळ्यात आंबे खाण्याची मजा काही वेगळीच. प्रत्येकालाच उन्हाळ्यात आंबे खाण्याची इच्छा असते. आंब्यात पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. बाजारात लहान- मोठे, हिरवे- पिवळे, आंबट- गोड वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात.
अनेकदा आंबे खरेदी करत असताना गोंधळ होतो. सुरूवातीला तुम्हाला वाटतं या रंगाचे आंबे गोड असतील म्हणून तुम्ही ते तुम्ही खरेदी करता आणि मग आंबे आंबट लागले तर अपेक्षाभंग होतो आणि फसवणूक झाल्यासारखं वाटतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला चांगले आंबे निवडण्याची आणि साठवण्याची पध्दत सांगणार आहोत.
आंबा आंबट आहे की गोड, पिकलेला आहे किंवा कच्चा हे तुम्ही आंब्याच्या वासावरून माहीत करून घेऊ शकता. आंबे विकत घेत असताना वरच्या टोकाला तर तुम्हाला गोड आणि चांगला सुगंध आला म्हणजेच आंबे पिकलेले आहेत. पण जर आंब्याला आंबट आणि एल्कोहोलिक वास येत असेल तर याचा अर्थ असा की हे आंबे ताजे नाहीत. जास्त सॉफ्ट सहज दाबले जाणारे आंबे अनेकदा आतून खराब असण्याची शक्यता असते.
आंबे साठवून ठेवण्याची पद्धत
कच्चे आंबे तुम्ही रुम टेंपरेचर वर ठेवू शकता. त्यामुळे आंबे लवकरत गोड आणि सॉफ्ट होतील.जर तुम्हाला आंबे लवकर पिकावेत असं वाटत असेल तर पेपर बॅग किंवा पेटीमध्ये स्टोर करून ठेवू शकता. पूर्णपणे पिकलेल्या आंब्याना तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं असेल तर फ्रिजमध्ये ठेवा. पिकलेले आंबे एका आठवड्यापर्यंत फ्रिजमध्ये व्यवस्थित राहू शकतात. (हे पण वाचा-हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे)
जर तुम्हाला आंबा कापल्यानंतर जास्त आंबट वास येत असेल किंवा आंबा मधल्या भागात जास्त काळा दिसत असेल तर अशा आंब्याचे सेवन करू नका. कारण असा आंबा खाल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारी पडण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-पुरुषांनी चिक्कूचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासह 'हे' होतील फायदे)